Bharat Rice: सरकारचा मोठा निर्णय; “भारत चावल” आता फक्त 29 रुपये प्रति किलोमध्ये

Bharat Rice: सरकारने तांदूळाच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी तांदूळ मिल आणि व्यापारी यांना तांदळाचा साठा जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार खाद्य मंत्रालयाच्या पोर्टलवर तांदळाच्या साठ्याची घोषणा करणे आता या सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, भारत चावलबद्दलही (Bharat Rice) मोठी बातमी समोर आली आहे. सरकार तांदळाच्या साठ्यावर मर्यादा (Rice Stock Limit) लावण्याचा विचारात असून आत्तापर्यंत सर्व प्रयत्नांनंतरही तांदळाच्या किंमती कमी होत नसल्याने सरकारने तांदूळ मिल, व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांना तांदळाचा साठा जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे काय होईल? (Bharat Rice)

तांदळाच्या साठ्याची माहिती मिळाल्याने सरकारला तांदळाच्या बाजारपेठेवर लक्ष ठेवणे सोपे होईल आणि साठ्याची मर्यादा लादल्याने तांदळाची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, तसेच किंमती नियंत्रित राहण्यास मदत मिळेल. सरकारचा कोणताही निर्णय सर्वात अगोदर देशातील लोकांच्या हिताचा ठरला पाहिजे, आणि तांदळाबाबत या निर्णयामुळेच देशातील ग्राहकांना तांदूळ वाजवी दरात मिळण्यास मदत मिळणार आहे.

सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी “भारत चावल” नावाचा स्वस्त तांदूळ बाजारात आणला होता आणि आता हा तांदूळ 29 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध होईल(Bharat Rice). यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा फायदा निळणार आहे. खाद्य सचिवांनी स्पष्ट केले आहे की, तांदळाची निर्यात बंद करण्याचा विचार सध्या तरी केला जात नाहीये, मात्र सरकार तांदळाच्या साठ्यावर मर्यादा घालण्याचा विचार करत आहे. यामुळे तांदळाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. दुसरीकडे, यंदाच्या वर्षी साखरेचे उत्पादन 10 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, आपल्याजवळ साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे साखरेच्या किंमती वाढण्याची शक्यता अद्याप तरी वाटत नाही.