Bharat Rice: सर्वसामान्य जनतेला मिळणार आनंदाची बातमी; सरकार विकणार 25 रुपये दराने तांदूळ

Bharat Rice : सध्या जगभरात महागाई दिवसेंदिवस वाढतेय आणि यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील वाढत चालल्या आहेत. आपल्या भारताची देशाची अर्थव्यवस्था जरी सुधारत असली तरी बाजारातील महागाई सामान्य माणसाचे जीवन हैराण करत आहे. सामान्य माणसाच्या जीवनावर महागाईचा कश्याप्रकारे परिणाम होतोय हे सरकार जाणते आणि म्हणूनच त्यांचे जीवन सुखकर बनवण्यासाठी जमेल त्यानुसार वस्तूंच्या किमती कमी करण्यावर लक्ष्य केंद्रित करून ते कार्य करत आहे. भारत सरकारकडून सामान्य जनतेला मदत करण्यासाठी काही धान्यांचे दर आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, आणि म्हणूनच येणाऱ्या दिवसांत बाजारात तांदूळ सवलतीच्या दरांत पुरवले जातील. त्यानुसार सरकार आता 25 रुपये प्रति किलो दराने विकणार आहे.

सरकार घटवणार तांदुळाच्या किमती: (Bharat Rice)

वरती नमूद केल्याप्रमाणे भारतातील अधिकांश लोकसंख्या हि मध्यमवर्गीय आहे, अशी लोकं महिनाभर मेहनत करत पैसे कमावतात आणि मिळालेल्या मासिक पगाराच्या अनुसार त्यांच्या खर्चाचे नियोजन करतात. मात्र अचानक बाजारात झालेले बदल त्यांचे नियोजन संपूर्णपणे बिघडवून टाकू शकतात. जनतेची हीच परिस्थिती ओळखून भारत सरकार वेळोवेळी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते. आताच्या घडीला जनसामन्य माणसाला मदतीचा हात पुढे करत सरकारने तांदुळाच्या किमती कमी करण्याची योजना आखात आहे. तांदूळ हा भारतीयांच्या जेवणातला प्रमुख घटक, खास करून मराठी घरांमध्ये तर तांदुळाशिवाय जेवण पूर्ण होणारच नाही आणि म्हणूनच तांदुळाच्या किमतीमध्ये झालेला बदल त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करू शकतो.

तांदुळाच्या किमतींमध्ये घसरण झाल्यानंतर आता तांदूळ 25 रुपये प्रति किलो दराने विकला जाणार आहे. याआधी सरकारकडून गव्हाचे पीठ आणि डाळ सवलतीच्या दरांमध्ये विकली जायची, त्यानंतर आता यांत तांदुळाचा समावेश झाला आहे. हा तांदूळ नेशनल ऍग्रीकल्चर कोर्पोरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन इंडिया (NAFED), नेशनल कोपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशन, केंद्रीय भांडार आउटलेट आणि मोबाईल व्हेनद्वारे विकला जाईल. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांपर्यंत जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी आणि त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार 25 रुपये किमतीच्या दारांत ‘भारत राईस’ (Bharat Rice)ची विक्री करण्याच्या तयारीत आहे.

बाजारात धान्यांच्या किमती काय?

वर्ष 2023 च्या नोव्हेंबर महिन्यात अन्न-धांन्याच्या किमतींमध्ये 10.3 टक्क्यांची वाढ झाली, परिणामी ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत धान्यांच्या किमतींनी 8.7 टक्क्यांएवढी उंच उडी घेतली. आताच्या घडीला भारत सरकारडून गव्हाचे पीठ आणि चणा डाळ अनुक्रमे 27.50 रुपये आणि 60 रुपये प्रति किलोच्या दराने विकली जाते आणि तांदुळाचा किरकोळ सरासरी दर 43 रुपये प्रति किलो असा आहे. हीच वाढती किंमत लक्ष्यात घेता सरकारने सवलतीच्या दरांत ‘भारत राईस'(Bharat Rice)च्या वितरणाचा विचार केला असावा. गेल्या अनेक महिन्यांपासून धान्यांच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, आणि गैर बासमती तांदुळाच्या निर्यातीवर घातलेली बंदी हे त्याचे उत्तम उदाहरण ठरू शकते.