बिझनेसनामा ऑनलाईन । चांद्रयान -3 च्या यशानंतर भारताने जगात चंद्रावर जाणारा चौथा देश बनून चार चांद लावले . जगात इस्रोशी संलग्नित भागीदारांची वाह वाह सुरूच आहे. याचा परिणाम संबंधित कंपन्याच्या शेअर्सना (BHEL Share Price) होताना दिसत आहे. अशाच एका चांद्रयान -3 शी संबंधित असलेल्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत धमाकेदार वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कंपनीचे शेअर्स तब्बल 12% नी वाढले आहेत. हि सरकारी कंपनी म्हणजे BHEL (Bharat Heavy Electricals Limited)
सरकारी कंपनी BHEL शेअरमध्ये धमाकेदार वाढ :
NTPC या कंपनीकडून BHEL ला Thermal power plant साठी 4000 करोडची ऑर्डर मिळाल्या मुळे कंपनीच्या शेअर ने घोडैदौड सुरु केली असून कंपनीचे शेअर्स (BHEL Share Price) सलग पाचव्या दिवशी वाढताना दिसून आले. कंपनीचा शेअर तब्बल 12.2% नी वाढून 136.10 रु. वर स्थिरवला . संपूर्ण आठवड्यात कंपनीचा शेअर 29.24% नी वाढलेला पाहायला मिळाला.
चांद्रयान-3 मोहिमेमुळे कंपनीला 10 हजार करोडचा फायदा : (BHEL Share Price)
विक्रम लँडर चंद्रावर यशस्वी पद्धतीने लँड झाल्यानंतर BSE च्या आकडेवारी नुसार 24 ऑगस्ट रोजी कंपनीची मार्केट कॅप 37466.99 कोटी रुपये होती. आठवड्याभरात कंपनीची मार्केट कॅप वाढून 47390.88 कोटी इतकी झाली आहे. कंपनीला 2,800 मेगावॅट सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प स्टेज-II साठी ऑर्डर मिळाली आहे. प्रकल्पाची रचना, अभियांत्रिकी, निर्माता, पुरवठा, बांधकाम, चाचणी अशी सर्व कामे कंपनी करणार आहे.