बिझनेसनामा ऑनलाईन । आजकाल मार्च तिमाहीच्या निकालानंतर शेअर बाजारातील बहुतेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना डिवीडेंट देत आहे .भारतीय स्टेट बँकेने सुद्धा डिवीडेंट देण्याची घोषणा केली आहे . त्यानुसार, बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 11 रुपये 30 पैसे रुपयांचा प्रति इक्विटी शेअर डिवीडेंट घोषित केला आहे. 14 जून 2023 रोजी हि रक्कम गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा होईल.
शेअर बाजारातील उपलब्ध माहिती नुसार, भारतीय स्टेट बँकेने मार्च २०२३ च्या तिमाही निकालात बँकेच्या नफ्यामध्ये मध्ये 83% ची वाढ झाल्याची नोंद केली असून बँकेचा नफा 16 हजार 694 कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील एकूण नफा हा 59 टक्क्यांनी वाढून 50232.45 कोटी रुपये झाला आहे. याशिवाय शेवटच्या तिमाहीत एसबीआय ला फक्त व्याज रकमेतून 29 टक्के प्रॉफिट होऊन ती रक्कम 40,392 कोटी रुपयेपर्यंत पोहोचले आहे. बँकेचे शुद्ध व्याजदराचे मार्जिन हे 44 वाढून 3.84% पर्यंत पोहोचले आहे.
NPL स्थिती –
ग्रॉस NPL 3.14% घसरून 2.78 टक्क्यांपर्यंत गेला आहे आणि नेट NPL घसरून 0.67% पर्यंत झाला आहे आणि कॉर्पोरेट लोन मध्ये क्रमशः 13.31% आणि 12.52 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली .
डिवीडेंटची घोषणा –
यासोबतच बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 11 रुपये 30 पैसे रुपयांचे प्रति इक्विटी शेअर डिवीडेंट घोषित केला आहे 14 जून 2023 रोजी हि रक्कम गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा होईल. आठवड्याच्या चौथ्या गुरुवारी एसबीआय बँकेच्या शेअर मध्ये जवळपास दोन टक्क्यांची घसरण दिसून आली आणि शेअर 575 रुपयांवर स्थिरावला. एका वर्षाच्या कालावधीत या शेअरने 26 टक्कयांहून अधिक रिटर्न दिले आहेत.