Bill Gates : AI मुळे माणूस आठवड्यातून 3 दिवस काम करून 4 दिवसांसाठी आराम करू शकतो- बिल गेट्स

बिझनेसनामा ऑनलाईन । Infosys या कंपनीचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी देशातील तरुण पिढी हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे आणि जगावर राज्य करायचं असेल तर दर आठवड्याला आपण किमान 70 तास काम करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. या त्यांच्या वक्तव्यावर देशभरातून अनेकांनी त्यांचे समर्थन केले तर काही जणांनी त्यावर टीकास्त्र सोडले. मात्र आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजेच बिल गेट्स (Bill Gates) यांनी देखील संदर्भात एक महत्त्वाचा वक्तव्य केले आहे, काय म्हणतात बिल गेट्स जाणून घेऊया…

बिल गेट्स यांचं महत्वाचं वक्तव्य: (Bill Gates)

गेल्या काही दिवसांपासून नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून किमान 70 तास काम करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केल्याने देश आणि विदेशात याबद्दल चर्चा सुरू झाली. नारायण मूर्ती हे एका मोठ्या आयटी कंपनीचे मालक असल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला तो खरोखरीच जोर आहे, त्यानंतर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे बिल गेट्स (Bill Gates) यांनी नारायण मूर्ती यांच्या विरुद्ध वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे. बिल गेट्स यांनी कॉमेडियन ट्रैवर नोव्हा पोडकास्ट What Now मध्ये बोलताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रोत्साहन दिलं. आर्टीफिशल इंटेलिजन्समुळे लोकांना कसा फायदा होऊ शकतो बद्दल ते बोलताना दिसले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही कोणाची जागा घेणार नाही पण लोकांना त्यांच्या कामातच मदतच करेल असंही ते म्हणाले. याच्या मदतीने माणूस हा आठवड्यातून केवळ 3 दिवस काम करून 4 दिवसांसाठी आराम करू शकतो असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाजूने बोलले बिल गेट्स:

एकंदरीत बिल गेट्स यांनी केलेल्या वक्तव्यावरून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पूर्णपणे समर्थनात आहेत याची खात्री पटते. त्यांनी म्हटले आहे की येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जगभरातून पूर्णपणे स्वीकृती मिळेल, कारण यामुळे माणसावर असणारा कामांचा भार कमी होणार आहे. भविष्यात मशीनस मध्ये भरपूर वाढ होणार आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही लोकांच्या पोटावर पाय देणार नाही तर मदत करणार असल्याचा तसेच या मदतीमुळे लोकांच्या हातात भरपूर वेळ राहील जो की पुढे जाऊन ते स्वतःसाठी खर्ची घालू शकतील असा विश्वास त्यांनी (Bill Gates) व्यक्त केला आहे.