Binny Bansal Resign : बिन्नी बन्सल यांचा Flipkart ला कायमचा रामराम!! मात्र एवढं झालं तरी काय?

Binny Bansal Resign : Flipkart या प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग(Online Shopping) कंपनीची सुरुवात बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी मिळून केली होती. मात्र आज जाहीर झालेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आता बिन्नी बन्सल यांनी Flipkart मधून काढता पाय घेतला आहे. खरं तर Flipkart म्हटलं की आपल्याला बिन्नी आणि सचिन बन्सल आठवतात मात्र असं काय कारण आहे ज्यामुळे अचानक बिन्नी बन्सल यांनी Flipkartला सोडण्याचा निर्णय घेतलाय हे पाहुयात. काही काळ अगोदर समोर आलेली माहिती सांगते की बिन्नी बन्सल हे स्वतःची कंपनी सुरु करण्याच्या मागार्वर आहेत, आणि या नवीन कंपनीला त्यांनी OppDoor असं नाव दिलंय. ही कंपनी जगभरातील e-commerce व्यवसायांना जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यात, त्यांच्या ग्राहकांचे वर्तन समजून घेण्यात, कर आणि नियमांचे पालन करण्यात, भागीदारांसोबत काम करण्यात आणि तृतीय-पक्ष विक्रेत्यांचा वापर करण्यात मदत करेल.

बिन्नी बन्सल फ्लिपकार्ट सोडणार का? (Binny Bansal Resign)

OppDoor ही कंपनी ग्राहकांना Amazon वर विक्री व्यवस्थापित करण्यासाठी आणि त्या ब्रँडला जागतिक स्तरावर विस्तारण्यात मदत करणार आहे. त्यांच्या मते, Amazon चा वापर करून व्यवसाय विस्तीर्ण करणे ही एक उत्तम संधी आहे, जागतिक स्तरावर व्यवसाय घेऊन जाणाऱ्या विक्रेत्यांना Amazon चा वापर करून अधिकाधिक विक्री करता येईल तसेच भरपूर पैसे कमावता येतील. OppDoor च्या म्हणण्यानुसार, जागतिक विस्तार करणाऱ्या Amazon च्या विक्रेत्यांची विक्री 63% पेक्षा जास्त पटीने वाढली आहे. खरं तर या कंपनीची सुरुवात वर्ष 2021 मधेच झाली होती, मात्र तेव्हा तिचं नाव Three State Ventures Pte Ltd असं ठेवण्यात आलं होतं.

बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी वर्ष 2018 मध्ये Flipkart ची सुरुवात केली होती, मात्र सचिन बन्सल यांनी Flipkart मधील आपली काही मालमत्ता Walmart कंपनीला विकली आणि या विक्रीच्या बदल्यात त्यांना खूप सारे पैसे मिळाले. त्यामुळे त्यांनी Flipkart मधील आपली थेट गुंतवणूक संपवली होती. या नंतर बिन्नी बन्सल (Binny Bansal Resign) यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार Flipkart आता सुरक्षित हातांमध्ये व्यवहार करीत आहे, त्यांचा एकूणच व्यवसाय जोर धरून वावरतोय आणि म्हणूनच त्यांनी देखील कंपनीमधून एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, या मोठ्या निर्णयानंतर त्यांनी Flipkart अधिकाधिक प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.