Bisleri New Plan : कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर उभे असताना तुम्ही बिसलरी ही पाण्याची बाटली नक्कीच विकत घेतली असेल. मात्र कधी या कंपनीचे मालक कोण आहेत याचा विचार केला आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारतभर नाव गाजवणाऱ्या बिसलरी या पाण्याच्या व्यवसायाला एका मुलीच्या कष्टांची गोष्ट जोडलेली आहे. वर्ष 2022 मध्ये कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी उत्तराधिकारी नसल्यामुळे सर्व व्यवसाय टाटा ग्रुपला विकून टाकण्याचा निर्णय घेतला होता मात्र काही कारणास्तव आयत्यावेळी हा करार रद्द झाला आणि त्यानंतर कंपनीची सगळी जबाबदारी जयंती चौहान म्हणजेच पूर्व मालकाची मुलगी यांनी सांभाळली आहे. आज जाणून घेऊया बिसलरी व्यवसाय उत्तम रित्या सांभाळणाऱ्या जयंती चौहान यांची प्रवास कथा….
अशी आहे Bisleri ची वाटचाल:
आज आपल्या देशात बिसलरी ही सर्वात मोठी पॅकेड वॉटर कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि देशात नाव कमवल्यानंतर आता कंपनीचे मालक तिला सात समुद्र पार घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत (Bisleri New Plan). तुम्हाला माहिती आहे का बिसलरी केवळ पाण्याचा व्यवसाय सांभाळत नाही, तर या व्यतिरिक्त देखील इतर क्षेत्रांमध्ये व्यवसाय वृद्धिंगत करावा म्हणून जयंती चौहान काही आखण्या करीत आहेत. जवळपास 7 हजार करोड रुपये मार्केट वॅल्यु असलेल्या या व्यवसायामध्ये जयंती चौहान यांना काहीच रुची नव्हती आणि घरूनच व्यवसाय सांभाळण्यासाठी उत्तराधिकारी नसल्यामुळे पूर्व मालकांनी कंपनीचे जबाबदारी टाटा ग्रुप वर सोपवण्याचा निर्णय घेतला होता. काही कारणास्तव फसलेल्या या करारानंतर जयंती चौहान यांनी व्यवसायाचे सूत्र आपल्या हातात घेतली आणि त्यानंतर कंपनीची सुरु यशस्वी घोडदौड आजपर्यंत सुरू आहे.
Bisleri टाटा कंपनीची झाली असती का?
बिसलरी कंपनीच्या पूर्व मालकांनी वयात होणारी वाढ आणि शारीरिक क्षमतेत दिवसेंदिवस होणारी घट लक्षात घेता कंपनी टाटा ग्रुप्स यांच्या हाती सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान व्हॅल्युएशनच्या बाबतीत काही गणित न जुळल्यामुळे हा करार पूर्ण झाला नाही. हा करार जर का पूर्ण झाला असता तर आज बिसलरी ही कंपनी टाटा समूहाचाच भाग बनली असती. जयंती चौहान यांनी बाजारात पदार्पण केल्यानंतर स्वतःच नवी आखणी बनवत कंपनीला उच्च शिखरावर नेऊन ठेवण्याची जबाबदारी उचलली(Bisleri New Plan). त्यांनी कार्बोनेटेड कोल्ड्रिंकच्या बाजारात देखील बिसलरीचे नाव रुजू केले आहे. यामध्ये bisleri pop, bisleri rev, spicy jeera, bisleri lamonata इत्यादींचा समावेश होतो.
आपण आजूबाजूच्या बाजाराचा अभ्यास केला तर एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात येईल की ज्या एका ब्रँडची सर्वात जास्त विक्री केली जाते किंवा जो ब्रँड ग्राहकांच्या मनात सर्वाधिक उतरतो, त्या कंपनीच्या नावे ती वस्तू ओळखली जाते. अनेक वेळा आपण “टूथपेस्ट” न म्हणता सरळ “कोलगेट” म्हणून जातो, याचाच अर्थ असा की ग्राहकांच्या मनात टूथपेस्ट म्हणजेच कोलगेट हे नाव रूढ झालंय. काही अंशी हेच बिसलरीच्या बाबतीत देखील सत्य आहे, अनेक वेळा आपण दुकानात जात पाण्याची बाटली द्या असं ना म्हणतात, “एक बिसलरी द्या” असंच म्हणत नाही का?
असे आहे Bisleri चे साम्राज्य: (Bisleri New Plan)
भारतीय बाजारात मजबूत पकड बनवलेल्या बिसलरी या कंपनीचा एकूण दोन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झालेला आहे आणि दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसते. जयंती चौहान यांच्या मते त्यांना अधिकाधिक ग्राहक कंपनीसोबत जोडण्यासाठी नवनवीन गोष्टींवर भर द्यायची आहे. येणाऱ्या काळात बिसलरीच्या व्यवसायाला सात समुद्रा पार घेऊन जाण्याची देखील त्यांची महत्त्वकांक्षा आहे.