Black Friday Sale : आज खरेदीवर मिळणार मोठी सूट; जाणून घ्या काय आहे ब्लॅक फ्रायडे

Black Friday Sale : ऑनलाई शॉपिंग करत आहात का? हो तर ब्लॅक फ्रायडे सेल बद्दलही तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. 24 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज देशभरात ब्लॅक फ्रायडे सेल आयोजित केला गेला आहे. जगभरातील अनेक कंपन्या दरवर्षी एका ठराविक दिवशी ब्लॅक फ्रायडे सेलचं आयोजन करतात आणि यावेळी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर भलामोठा असा डिस्काउंट दिला जातो. आज थोडक्यात जाणून घेऊया ब्लेक फ्रायडे सेल म्हणजे काय…

Black Friday Sale म्हणजे काय?

या ब्लॅक फ्रायडे या संकल्पनेची सुरुवात अमेरिका या देशातून झाली, पण गेल्या काही वर्षांपासून हा दिवस जगभरात साजरा केला जातोय. डिसेंबर महिन्यात नाताळचा सण साजरा केला जातो आणि त्या अनुषंगानेच लोकं साधारणपणे खरेदीला सुरुवात करतात, आणि म्हणूनच हा सेल आयोजित केला जातो. यावर्षी आज म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी म्हणजे ब्लॅक फ्रायडे सेलंची सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या असून Amazon , Ebay अशा ई-कॉमर्स साईटद्वारे आकर्षक दरांत खरेदी करण्याची हि उत्तम संधी आहे, त्यामुळे लक्ष्यात घ्या कि आज मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर अ‍ॅक्सेसरीज आणि गेमिंग डिव्हाईसेसवर मोठ्या प्रमाणात सुट देण्यात येणार आहे.

ब्लॅक फ्रायडे सेलची सुरुवात कशी झाली?

या दिवसाची सुरुवात साधारणपणे सत्तरच्या दशकात झाली, थँक्सगिव्हिंग या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फिलाडेल्फिया शहरात ख्रिसमसच्या खरेदीसाठी रस्त्यांवर गर्दी होत असे, आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तयार राहत असत. आणि शुक्रवारी हा दिवस येत असल्याने पोलिसांकडून याला ब्लॅक फ्रायडे असं नाव देण्यात आलं.

ब्लॅक फ्रायडे या संकल्पनेला अनेक गोष्टी जोडल्या जातात, यातीलच एक म्हणजे अनेक कर्मचारी थँक्सगिव्हिंगच्या डिनरनंतर दुसऱ्या दिवशी कामावर जायला इच्छुक नसतात आणि टाळाटाळ करतात आणि कारण म्हणून आजारी असल्याचं देखील सांगतात, म्हणूनही याला ब्लॅक फ्रायडे असं म्हणून संबोधलं जातं. आता अनेक दुकादार या दिवशी मोठमोठे डीस्काउंट देतात (Black Friday Sale) आणि म्हणूनच याला मार्केट मध्ये महत्व आहे.