boAt Success Story : 5 वर्षात कंपनीने गाठली यशाची शिखरं; अमन गुप्ता यांची यशस्वी खेळी

boAt Success Story: तुम्ही शार्क टेंक इंडिया हा कार्यक्रम पाहिला आहे का? हो तर अमन गुप्ता हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. BoAt कंपनीचा मालक म्हणजे अमन गुप्ता. हि कंपनी आज घराघरांत पोहोचलेली आहे. पण यामागे किती मेहनत आणि कष्ट असतील यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे का? अमन गुप्ता हे वागण्यात खेळकर आणि खोडकर पण तरीही व्यवसायाच्या बाबतीत अगदी चोख आहेत. आज आपण याच अमन गुप्ता आणि boAt यांची गोष्ट जाणून घेऊया..

अमन गुप्ता यांचे पूर्वायुष्य:

अमन गुप्ता यांचा जन्म 1982 मध्ये झाला. दिल्ली येथे वाढलेल्या आणि शिकलेल्या अमन गुप्ता यांच्याजवळ Charted Accountant ची पदवी मिळवली आणि यानंतर बँकमधून त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली. इथपर्यंत त्यांच्या मनात व्यवसायाचा विचार आला नव्हता आणि वेगळ्याच अनुषंगाने यशस्वी होण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु होते. वर्ष 2005 पासून खरं तर गुप्ता यांच्या मनात व्यवसाय करण्याची इच्छा जागृत झाली आणि म्हणून त्यांनी MBA ची पदवी धारण केली, यावेळी ते हर्मन कंपनीसोबत काम करत होते आणि नंतर पाच वर्षात boAt कंपनीचा जन्म झाला, कंपनीची सुरुवात करण्यासाठी अमन आणि समीर मेहता यांनी हातमिळवणी केली होती.

boAt ची गोष्ट थोडक्यात: boAt Success Story

boAt कंपनीने आपला व्यवसाय सुरु केला चार्जिंग केबल आणि एपल फोनचे चार्जर विकून. वर्ष दीड वर्षात कंपनीने भापूर नफा कमवायला सुरुवात केली होती आणि 100 कोटी रुपयांचा व्यवसाय त्यांनी केला होता. आज अमन गुप्ता हे देशातील सर्वोत्तम उद्योगपतींपैकी एक आहेत, आणि देशातील 20 मिलियन लोकांच्या घरी त्यांचे प्रोडक्ट्स पोहोचलेले आहेत.

अमन गुप्ता हे मुळातच हाडाचे व्यापारी आहेत आणि म्हणूनच आज त्यांच्या कंपनीने नाव प्रत्येकाच्या ओठांवर (boAt Success Story)आहे. हि कंपनी तरुण पिढीला आवडणारे, रुचणारे आणि पचणारे प्रोडक्ट परवडणाऱ्या किमतींमध्ये उपलब्ध करवून देतात आणि म्हणून मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये त्यांची प्रसिद्धी जास्ती आहे. हार्दिक पांड्या, के एल राहुल यांसारखे दिग्गज boAt कंपनीचे इम्बेसेडर्स आहे, लोकांमध्ये असलेली त्यांची प्रसिद्धी कंपनीचा सेल वाढवायला मदत करते. त्यामुळे केवळ पाच वर्षांमध्येच कंपनीने यशाची शिखरं गाठली आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या काळात ते अजून प्रगती करतील अशी अपेक्षा आहे.