BOB App Ban । हल्ली सर्वच बँका आपली अनेक आर्थिक कामं मोबाईल एपच्या मदतीने करतात. त्यामुळे ग्राहकांना छोट्या मोठ्या कामांसाठी बँकेच्या दारापर्यंत जात पायपिट करण्याची गरज राहिलेली नाही. आजचं जग डिजिटल झालेलं असल्यामुळे बहुतेक कामं हि घर बसल्याच होऊन जातात. यात लाईट बिल भरण्यापासून ते मोबाईल रिचार्ज करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत. पण तुम्ही Bank Of Baroda चे खातेधारक असाल तर आज तुमच्यासाठी एक चिंताजनक बातमी आहे, बँक ऑफ बरोडा (Bank Of Baroda) च्या द्वारे चालणाऱ्या अँप वर RBI ने कारवाई केलेली आहे. RBI ने अशी कारवाई नेमकी का केली हे जाणून घेऊया…
सार्वजनिक क्षेत्रात परिचित असणारी बँक म्हणजे Bank Of Baroda, या बँकच्या मोबाईल एपवर RBI ने कारवाई केलेली आहे. RBI ने नवीन ग्राहकांना या मोबाईल एपशी जोडू नये असा आदेश जाहीर केला आहे. Bank Of Baroda चा बॉब वल्ड (BOB World) या नावाचा मोबाईल एप आहे. या सुविधेचा वापर करून बँकचे अनेक ग्राहक युटीलिटी संदर्भात पेमेंट, तिकीटे, IPO इत्यादी सुविधा मिळवू शकतात. मात्र आता RBI च्या आदेशामुळे या सर्व हालचाली तातडीने स्थगित करण्यात आल्या आहेत.
RBI ने का केली कारवाई? BOB App Ban
Bank Of Baroda च्या एपमध्ये नवीन ग्राहकांना समाविष्ट करून घेण्याच्या प्रक्रियेत काही तृटी समोर आल्या आहेत.हि बाब चिंताजनक असल्यामुळे RBIने बँकच्या एपवर कारवाई केली आहे. बँकिंग नियम कायदा 1949च्या कलम 35 A च्या अनातर्गत हि कारवाई (BOB App Ban) करण्यात आली आहे. RBIच्या नजरेत आलेल्या सर्व चुका दुरुस्त केल्यानांतच हि स्थगती उठवली जाणार आहे. आता स्थगिती कायम असल्यामुळे नवीन ग्राहक Bank Of Baroda च्या एप मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. बँक मध्ये खाते असून अद्याप एपचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना आता थोडी वाट पहावी लागणार आहे. दरम्यान बँकेच्या सेवा तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाइन मिळवू शकता. बँक एपच्या जुन्या ग्राहकांना चिंतेचे कारण नाही तरीही त्यांनी काळजी घावी असा आदेश RBI ने दिला आहे.