BOB App Ban : बँक ऑफ बडोदाकडून आज एक मोठी बातमी समोर आली आहे, काही दिवसांपूर्वी या बँकच्या एका एप विरोधात कारवाई करण्यात आली होती. आणि या प्रकरणात दोषी आढळून आलेल्या लोकांच्या विरोधात आता बँकेकडून कठोर पाऊले उचलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व बँककडून बँक ऑफ बडोदाच्या अँपवर नवीन ग्राहकांना जोडण्यास मनाई केली होती, हे अँप बँकने स्वतः तयार केले असून नेट बँकिंगसाठी याचा वापर केला जातो. मात्र चुकीची पद्धत वापरून या एपमध्ये ग्राहकांचा समावेश केल्यामुळे हि कारवाई करण्यात आली होती. मात्र आता संबंधित प्रकरणात 60 पेक्षा जास्ती लोकं गुन्हेगार म्हणून आढळून आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये बँकचे 11 मेनेजर आणि बाकी ओडीट विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बँकेकडून गुन्हा मान्य : BOB App Ban
बँक ऑफ बडोदा झालेला प्रकार मान्य केला आहे. बँकच्या काही कर्मचाऱ्यांनी बँकची संमती न घेता खात्यातील नंबर एपवर टाकले होते. निलंबित केलेले अधिकांश अधिकारी हे वडोदरा भागातील आहेत. या सोबतच अशीही बातमी समोर आली आहे कि येणाऱ्या काळात बँक लखनऊ, भोपाळ राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये अशीच कारवाई करू शकते. बँक ऑफ बरोडा लवकरच रिझर्व बँकला संबंधित घटनांचा अहवाल देणार आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर बँक ऑफ बडोदाने बँकेने 11 AGM सह 60 हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. जर कर्मचारी दोषी आढळले तर त्याला दुसरीकडे पोस्टिंग मिळू शकते किंवा त्याची नोकरीही जाऊ शकते. या संपूर्ण घटनेने (BOB App Ban) बँक ऑफ बडोदाची मोठी नाचक्की झाली आहे.