BOB Parivar Account : आता संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन करा गुंतवणूक; BOB ने आणली खास योजना..

BOB Parivar Account : आपल्या देशात अनेक बँका कार्यरत आहेत, यांपैकी एक महत्वाची बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदा . बाकी अनेक बँकांप्रमाणेच हि बँक देखील ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक योजना राबवत असते. सध्या त्यांनी BOB परिवार अकाऊंट अशी नवीन योजना बजारात आणली आहे, याचे नाव ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल कि या योजनेंतर्गत तुम्ही परिवारासोबत गुंतवणुकीचा विचार करू शकता. जगभरात दिवसेंदिवस महागाईचं प्रमाण वाढत आहे, आणि त्याच्यासोबत जर का टिकाव धरायचा असेल तर गुंतवणुकीची जोड सोबत असणे महत्वाचे आहे. पण लक्ष्यात ठेवा, अशी कोणतीही गुंतवणूक करताना ती सुरक्षित आहे कि नाही याची पारख करता आली पाहिजे.

काय आहे BOB ची नवीन परिवार योजना? (BOB Parivar Account)

बँक ऑफ बडोदा ने ग्राहकांसाठी आणलेल्या या नवीन योजनेअंतर्गत तुम्हाला बचत (Saving) आणि चालू (Current) दोन्ही खात्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. BOB के संग त्योहार कि उमंग या सणांच्या मोहिमेत त्यांनी My Family, My Bank हे सेग्मेंट सुरु केले आहे. इथे बँक एका कुटुंबाच्या अंतर्गत सदस्यांची सर्व खाती एकाच गटात समाविष्ट करतो. इथे प्रत्येक खाते हे प्राथमिक खातेधाराकाद्वारे चालवले जाणार आहे. रवींद्र सिंघ हे बँकचे मुख्य व्यवस्थापक आहेत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कंपनी किंवा परिवारातील सदस्यांची खाती एकत्र केल्याने त्याचा भरपूर फायदा ग्राहकांना मिळणार आहे. बँकमधील परिवार (BOB Parivar Account) खात्यामुळे सर्व वैयक्तिक खात्यांना एकत्रित राखून ठेवलेल्या बेलेंसमधून फायदा मिळणार आहे. इथे तुम्हाला प्रत्येक खात्याची वेगवेगळ्या तऱ्हेने देखरेख करण्याची गरज नाही. गेल्या 115 वर्षांपासून कार्यरत असलेली हि बँक अनेक परिवारांच्या खात्यांची पिढ्यानपिढ्या जपणूक करत आली आहे. म्हणूनच आता ग्राहकांना नवीन सवलत मिळवून देण्यासाठी बँकने My Family,My Bank हि योजना सुरु केली आहे.

BOB परिवार योजनेचा भाग कसे बनाल?

BOB परिवार योजनेत गुंतवणूक करण्यासाठी दोन किंवा अधिकाधिक सहा सदस्य एकत्र येऊ शकतात. BOB बचत खात्यात परिवारातील सदस्यांमध्ये नवरा-बायको, पालक, मुलं, सून, जावई इत्यानी मंडळी एकत्र येऊन गुंतवणूक सुरु करू शकतात. तर BOB चालू खात्यात व्यावसायिक कंपन्या एकत्र येऊन गुंतवणूक करू शकतात (BOB Parivar Account).

गुंतवणुकीची विभागणी बँकने 3प्रमुख भागांमध्ये केलेली आहे, यामध्ये Diamond, Gold आणि Silver अश्या भागांचा समावेश होतो. बचत खात्यात गुंतवणूक करण्यासाठी, Diamond भागात गुंतवणूक करणार असाल तर 5 लाख किंवा अधिक प्रमाणात रक्कम गुंतवली जाऊ जाऊ शकते, तर Gold मध्ये 2 लाख किंवा त्यावर गुंतवणूक करण्याचा मार्ग उपलब्ध आहे आणि Silver या भागात 50,000 किंवा जास्ती रक्कम गुंतवण्याची सोय उपलब्ध आहे. तर चालू खात्यात Diamond- 10 लाख किंवा अधिक, Gold- 5 लाख किंवा अधिक आणि Silver-2 लाख आणि अधिक पैसे गुंतवण्याची सोय उपलब्ध आहे.