BOB UPI ATM : बँक ऑफ बडोदाची ग्राहकांना खुशखबर!! 6000 ATM वर UPI सुविधा सुरू

बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (BOB UPI ATM) आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. बँकेने देशातील जवळपास 6,000 ATM मशीनवर UPI Payment ची सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे आता केवळ UPI चा वापर करून ग्राहकांना पैशाची देवाणघेवाण करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या समन्वयाने UPI ATM लाँच करणारी बँक ऑफ बडोदा ही देशातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरली आहे.

कधी सुरु झाली ही नवीन पद्धत? BOB UPI ATM

5 ते 7 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये झालेल्या ग्लोबल फिन्टेक फेस्ट मध्ये BOB UPI ATM लॉंच करण्यात आलं. आता बँकचे ग्राहक किंवा इतर बँकांचे ग्राहक UPI App चा वापर करून डेबिट कार्ड शिवाय बँक ऑफ बडोदाच्या ATM मधून पैसे काढू शकतात. याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ग्राहक या UPI चा वापर करून विविध खात्यांमधून पैशांची रक्कम मिळवू शकतात.

कसे काढाल ATM वरून पैसे?

सर्वात आधी ATM स्क्रीनवर जाऊन ” UPI Cardless Cash” हा पर्याय निवडावा.

तुम्हाला किती पैश्यांची गरज आहे, ती रक्कम टाकावी.

UPI App चा वापर करून समोर दिसणारा QR Code Scan करावा.

ज्या खात्यातून पैसे काढायचे आहेत तो निवडावा.

UPI PIN टाकून पैसे काढावे .