बिझनेसनामा ऑनलाईन । तुम्ही बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे का काही दिवसांतच तुम्हाला या बँक ऑफ इंडियाच्या डेबिट कार्डचा (BOI Debit Card) वापर करता येणार नाही. याचं नेमकं कारण काय असेल असा भीतीदायक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होणं सहजीक आहे, घाबरून जाऊ नका कारण इथे आम्ही तुम्हाला संबंधित विषयाची सारी माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊया .
31 ऑक्टोबरनंतर Debit Card चा वापर बंद:
सरकारी बँक म्हणजेच बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनी यांची नोंद घेतली पाहिजे कि येत्या 31 ऑक्टोबर पासून तुम्हाला बँकच्या डेबिट कार्डचा वापर करता येणार नाही. या कार्डचा वापर करून तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकत नाही, किंवा ATM मध्ये जाऊन पैसे काढण्यासाठी सुद्धा या कार्डचा वापर करता येणार नाही. पण लक्षात घ्या कि तुमची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बँकने काही महत्वाची पाऊलं उचलेली आहेत.
हे आहे कारण : BOI Debit Card
X म्हणजेच पूर्वीच्या Twitter वर आपल्या ग्राहकांना माहिती देत बँक ऑफ इंडियाने कबुल केलं आहे कि रेग्युलेटरी सूचनांनुसार (Regulatory Guidelines) डेबिट कार्डच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी त्याला अधिकृत मोबाईल नंबर (Valid Mobile Number) जोडलेला असणं अनिवार्य आहे, तसे न केल्यास तुम्हाला त्या कार्डचा वापर करता येणार नाही. बँके कडून हे काम पूर्ण करण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे, मात्र 31 ऑक्टोबर नंतर जर का बँकच्या नियमांचे पालन झाले नाही तर डेबिट कार्डचा वापर तुम्हाला कायमचा बंद करावा लागेल.
नंबर अपडेट कसा करावा?
या प्रकारातून वाचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे वेळत आपला मोबाईल नंबर अपडेट करणे.जर का तुम्ही बँक ऑफ इंडियाचं डेबिट कार्ड (BOI Debit Card) वापरत असाल आपला मोबईल नंबर अपडेट करण्यासाठी जवळच्या बँकच्या शाखेत जा व हे काम त्वरित पूर्ण करा. बँकच्या शाखेत जाऊन तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल, यासोबत बँकेचा पासबुक आणि आधार कार्डची एक कॉपी अधिकाऱ्यांजवळ द्यावी लागेल. यानंतर तुमचा मोबाईल नंबर बदलला जाईल.