Boycott Maldives: बॉयकॉट मालदीवचा परिणाम; विमान बुकिंग धडाधड रद्द

Boycott Maldives: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या दौऱ्यावर असताना त्यांनी काही फोटोज स्पेशल मीडियावर शेअर केले. तसेच अनेकांनी लक्षद्वीपला भेट द्यावी अशी ही मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या मागणीवर मालदीव मधल्या काही मंत्र्यांनी विरोध दर्शवला, व त्या मंत्र्यांनी केलेली विशेष टिप्पणी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. मालदीव मधल्या मंत्र्यांनी केलेल्या या टिप्पणीचा परिणाम लक्ष्यात घेत, यावर त्वरित मार्ग काढत मालदीव सरकारकडून त्यांना निलंबित करण्यात आले. मात्र भारतीय अजूनही या प्रकरणाने संतप्त असून सध्या सोशल मीडियावर #boycottMaldives जोमाने वायरल होताना दिसते. मात्र ही घटना वाटते तेवढी साधी नाही, कारण याचा विपरीत परिणाम मालदीवच्या टुरिझम क्षेत्रावर होताना दिसत आहे. लक्षात घ्या की मालदीव येथे टुरिझम मधूनच सर्वाधिक कमाई केली जाते आणि अशा प्रकारे जर का #BoycottMaldives हा‌ ट्रेंड चर्चेत राहिला तर मालदीवला मोठा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

मालदीवसाठी परिस्थिती बिकट : (Boycott Maldives)

सध्या सर्वत्र Boycott Maldives हा ट्रेंड बनला असल्याने अनेक विमान कंपन्यांनी मालदीवसाठी केले जाणारे विमान प्रवास त्वरित रद्द करून लक्षद्वीपच्या सफारीवर आकर्षक सवलती उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला देखील माहिती असेल की गेल्या अनेक दिवसांपासून मालदीव हे पर्यटन स्थळ भारतीय पर्यटकांच्या यादीत सर्वात पाहिलं स्थान पटकावून आहे. मात्र देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या टिप्पणीमुळे मालदीवला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय. या टिप्पणीमुळे भारतातील जनता मालदीववर जबर रोख धरून आहे आणि त्या तीन मंत्र्यांना निष्कासित केल्यानेही यात कोणताही विशेष बदल दिसून आलेला नाही. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस लोकं मालदीवची तिकीट रद्द करीत आहेत.

मालदीव विरुद्ध उगारले सोशल मीडियाचे शस्त्र:

मालदीव आणि भारत यांच्यात सध्या सोशल मीडियावर चांगलाच युद्ध सुरू आहे. काही वापरकर्त्यांनी तर मालदीवला जाण्याची तिकीट रद्द केलेली असून सदर फोटोस ते इतरांसाठी सोशल मीडिया द्वारे शेअर करत आहेत. देशाच्या प्रधानमंत्र्यांविरुद्ध केलेल्या टिप्पणीनंतर एका माणसाने सोशल मीडियाचा वापर करत पाच लाख रुपयांपर्यंतची तीन आठवड्यांची तिकीट रद्द करून टाकण्याची माहिती दिली आहे.


आपल्याला जरी ही गोष्ट हलकी वाटत असली तरी मालदीवच्या दृष्टीने त्यांच्या अर्थव्यवस्थेला यामुळे जबर फटका बसू शकतो. EaseMy Trip हि ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री मधली सर्वात परिचित अशी कंपनी आहे, मात्र कंपनीकडून आलेल्या माहितीनुसार त्यांनी या टिप्पणीनंतर मालदीवला जाणारे सर्व बुकिंग रद्द करून टाकले आहेत (Boycott Maldives). कंपनीचे संस्थापक प्रशांत पिट्टी यांच्या मतानुसार,”ही कंपनी भारताची आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध केलेल्या टिप्पणीमुळे आम्ही मालदीवला जाणारे कुठलेही बुकिंग स्वीकारणार नाही”. शिवाय त्यांनी अयोध्या किंवा लक्षद्वीप यांना आंतरराष्ट्रीय ठिकाणं घोषित करावे अशी मागणी केली आहे.