बिझनेसनामा ऑनलाईन : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएल कंपनी भारत सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. मुंबईत बीपीसीएलचं मुख्यालय आहे. तेल आणि गॅस निर्मिती करणारी ही कंपनी असून मुंबई आणि कोचीनमध्ये दोन सर्वात मोठ्या रिफायनरी आहेत. 24 जानेवारी 1976 रोजी बर्मा शेल ग्रुप ऑफ कंपनीला भारत सरकारने टेकओव्हर केलं आणि त्या तिचे ‘भारत रिफायनरिज लिमिटेड’ अशी कंपनी स्थापन केली. त्यानंतर 1 ऑगस्ट 1977 रोजी केंद्र सरकारने या कंपनीचे ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ अर्थात बीपीसीएल असे नामकरण केले. पेट्रोलियम क्षेत्रातील बीपीसीएलचं नेटवर्क सर्वात भक्कम आणि मोठं असल्याचं मानलं जातं.
कंपनीने आपला तोच दबदबा कायम राखत शेअर बाजारातही यंदाच्या चौथ्या तिमाहीच्या निकालात बाजी मारत अपेक्षेपेक्षाही उत्तम कामगिरी केली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने यंदाच्या च्या मार्च तिमाहीत जोरदार कामगिरी केली आहे.यंदाच्या तिमाही मौसमात बीपीसीएल कंपनीचा चा स्वतंत्र नफा 158.99 टक्क्यांनी वाढून 6,477.74 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बीपीसीएलचा नफा 2501.08 कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीला 1,959.58 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
स्टँडअलोन महसूल वाढला
मार्च तिमाहीत बीपीसीएलच्या Standalone महसुलातही वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा स्वतंत्र महसूल 8.3 टक्क्यांनी वाढून 1,33,413.81 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा महसूल 1,23,382 कोटी रुपये होता. जर आपण तिमाहीच्या आधारावर पाहिले तर बीपीसीएलच्या नफ्यात नफा सघसरण झाली होती .
एकत्रित नफा
मार्च तिमाहीत बीपीसीएलच्या खर्चात वाढ झाली आहे. तो वाढून 1,24,668.36 रुपये झाला आहे. एकत्रित आधारावर कंपनीचा नफा 6,870.47 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत हा आकडा 2,559.17 कोटी रुपये होता. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी BPCL ची बाजारातील विक्री मागील आर्थिक वर्षातील 42.51 MMT च्या तुलनेत 48.92 MMT होती. विक्रीतील वाढ प्रामुख्याने एटीएफ (65.64%), एचएसडी-रिटेल (25.36%), आणि एमएस-रिटेल (18.01%) मध्ये दिसून आली होती.
कंपनीडिवीडेंट वितरित करेल
बीपीसीएलच्या बोर्डाने त्यांच्या शेअर्स होल्डरांसाठी डिवीडेंट घोषित केला आहे भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या बोर्डाने सांगितले की ते प्रत्येक 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर 4 रुपये डिवीडेंट देईल.त्याबाबत अंतिम निर्णयाला वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळणे बाकी आहे. BPCL शेअर्स सोमवारी NSE वर 0.50 टक्क्यांनी वाढून 362.10 रुपयांवर बंद झाला होता.
गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याच्या स्टॉकची किंमत 9 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. सन 2000 पासून आतापर्यंत, बीपीसीएलने त्यांच्या शेअर्स होल्डरांना चार वेळा बोनस दिला आहे.
सरकारने बीपीसीएलमधील आपली हिस्सेदारी विकण्याचा प्रयत्न केला होता
सरकार गेल्या तीन वर्षांपासून बीपीसीएलमधील आपली 52.98 टक्के हिस्सेदारी विकण्याचा प्रयत्न केला होता पण कंपनीची प्रगती पाहता त्यानी तो निर्णय मागे घेतला आहे.