बिझनेसनामा ऑनलाईन । गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटीमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या युनिट्सचे विलीनीकरण (BSE NSE) करण्याचा प्रस्ताव मुख्य टप्पयावर आला आहे. गुजरातच्या गांधीनगरमध्ये IFSC म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर आहे, ज्यामध्ये BSE INX आणि NSE INX विलीन केले जाऊ शकतात.
काय आहे नेमका विषय ? BSE NSE
येत्या काही दिवसांतच दोन्ही नावाजलेल्या Stock Exchange Companies एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन कंपन्या म्हणजेच BSE( Bombay Stock Exchange) आणि NSE( National Stock Exchange) येणाऱ्या काळात Gujrat International Finance मध्ये कायमच्या विलीन होऊ शकतात. या संदर्भातील अर्ज लवकरच NCLT समोर सदर केला जाईल.
दरम्यान असं म्हटलं जातंय की BSE आणि MSE च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काढून त्यांना या विलीनीकरणाची परवानगी मिळालेली आहे. या दोन कंपन्या एकत्र येणं हा लक्ष वेधून घेणारा विषय झाला आहे, कारण BSE आणि NSE या दोन्ही कंपन्या तश्या पहिल्या तर एकमेकींशी स्पर्धा करत असतात. मात्र अश्या दोन्ही टोकांना जोड्यण्याचा विचार भारत सरकारनेच केला आहे असं म्हटलं जातंय.
Stock Exchange Companies एकत्रीकरण का?
या दोन्ही कंपन्या (BSE NSE) आपापल्या परीने चांगलंच काम करत असल्या तरीही त्याचा Trading Value फारच कमी आहे, अश्यावेळी त्यांनी एकत्र येऊन काम केल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजार एकसंघ पणे परदेशी बाजारांशी चांगली स्पर्धा करु शकेल, असा विश्वास अधिकाऱ्यांना वाटतो. त्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे. या बद्दल काही जास्ती माहिती आत्ता तरी उपलब्ध नसली तरी लवकरच पूर्ण माहिती समोर येण्याची आशा बाळगली जात आहे. मात्र हा एक ‘ Share Merger’ ठरणार आहे एवढं मात्र नक्की. वार्षिक आर्थिक निकालानुसार BSEने 225 करोड रुपये India INX आणि त्याच्या सहाय्यक कॉर्पोरेशन्स मध्ये गुंतवले आहेत, तसेच आलेल्या माहितीनुसार एकत्रीकरणामध्ये NSE चे शेअर्स जास्ती असण्याची शक्यता अधिक आहे.