BSNL 5G Services : या जगात जर का टिकून रहायचं असेल तर एकाच मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे बदलत्या जगाबरोबर बदलणे होय. आज आपण 5G च्या जगात वावरत असताना BSNL कंपनी सुद्धा स्वतःला अपग्रेड करण्याच्या मार्गावर आहे. कारण जर का बाजारात ग्राहकांना टिकवूण ठेवायचं असेल तर या शिवाय वेगळा पर्यायाच उपलब्ध नाही. BSNLच्या ग्राहकांसाठी खरोखरच हि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, तर आज जाणून घेऊया नेमकी कधीपासून सुरु होणार आहे BSNLची 5G सर्व्हीसीस…
2024 पर्यंत 5G नेटवर्कचे टेस्टिंग पूर्ण होणार- BSNL 5G Services:
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL येत्या काही दिवसांतच आपल्या ग्राहकांसाठी 4G सर्व्हीसीस सुरु करणार आहे पण यापेक्षा आनंदाची बातमी म्हणजे पुढच्या वर्षी BSNL कंपनी 5Gच्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत कंपनी 5G नेट्वर्किंगचं एडव्हांस टेस्टिंग सुरु करणार आहे. लागोपाठ 4G आणि 5Gचा पल्ला गाठल्यामुळे BSNL कंपनीमध्ये वेगळाच हुरूप आलेला दिसतोय. जून 2024 पासून संपूर्ण देशात 5G ची सेवा सुरु करावी असा कंपनीचा मानस आहे.
जोमाने काम सुरु:
सेंटर फॉरडेव्हलोपमेंट ऑफ टेलीमेटीक्स(CDOT) या संस्थेमध्ये सध्या 200 जणांचा गट BSNL च्या सेवा 5G पर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत गुंतलेले आहेत. यासाठी कंपनीकडून 400 कोटी रुपयांचं बजेट तयार करण्यात आलं आहे. पाहायला गेलो तर आज BSNL कंपनी इतरांच्या तुलनेत नेटवर्क सर्व्हीसीसच्या बाबतीत (BSNL 5G Services) अजूनही मागे आहे. ग्राहक Vodafone आणि Jio कडे वळत असताना BSNL कडून हे पाऊल उचलण्याची फारच गजर होती, कदाचित आता शर्यतीत पुन्हा येऊन BSNL आपला ग्राहक वर्ग वाढवण्यात यशस्वी होऊ शकतात.