बिझनेसनामा ऑनलाईन । भारतामध्ये स्मार्टफोनचा वापर ज्याप्रमाणे वाढत चालला आहे, त्याचप्रमाणे सिमकार्ड आणि त्याचे रिचार्ज (BSNL Recharge) यांचेही महत्त्व वाढत चाललं आहे. भारतात जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया अशा कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक असे रिचार्ज प्लान आणत असतात. टेलिकॉम क्षेत्रातही मोठी स्पर्धा असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा या सर्व कंपन्यांचा प्रयत्न असतो. त्याचमुळे कमी पैशात जास्त फायदा देणारे प्लॅन या कंपन्या लाँच करतात असतात. याच पार्श्वभूमीवर BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी वर्षभर परवडेल असा रिचार्ज प्लान आणला आहे.
BSNL चा 2999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – (BSNL Recharge)
बीएसएनएलचा हा प्लॅनमध्ये एका वर्षाची म्हणजेच ३६५ दिवसांची वैधता आहे. तसेच या रिचार्ज प्लान मध्ये दररोज तब्बल 3 जीबी इंटरनेट वापरायला मिळतोय. तसेच जरी हा डाटा संपला तर त्यानंतर स्पीड 40 Kbps पर्यंत कमी होतो. तसेच या रिचार्ज प्लॅन अंतर्गत तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. इतकेच नाही तर प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. तुम्ही जर work from home करत असाल तर तुमच्यासाठी ह्यापेक्षा अधिक चांगला प्लॅन नसेल .
याव्यतिरिक्त बीएसएनएल (BSNL Recharge) आपल्या ग्राहकांना 1999 च्या रिचार्ज प्लॅनची सुद्धा सुविधा घेऊन आली आहे. हा सुद्धा वर्षभराचा रिचार्ज प्लॅन असून या प्लानच्या माध्यमातून दररोज 2GB इंटरनेटचा लाभ घेता येतोय. तसेच रोज 100 SMS चा फायदा घेता येतोय. तुम्ही जर विद्यार्थी किंवा साधारण वापर करते असाल तर तुमच्यासाठी हा प्लॅन फायद्याचा ठरेल. हे सर्व प्लॅन्स देऊन बीएसएनएल आपल्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात सक्षम ठरत आहे. आपल्यापैकी अनेक जण वर्षभराच्या प्लॅनच्या शोधात असतील त्यांच्यासाठी वरील प्लॅन नक्कीच उपयोगाचे ठरतील.