बिझनेसनामा ऑनलाईन । स्वदेशी आणि सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपले ग्राहक वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. BSNL इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने आणत असते. त्यामुळे ग्राहकांचे जास्तीचे पैसे वाचतात आणि त्यांना इंटरनेटचा आनंदही मिळतो. आताही बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. यामध्ये तब्बल 150 दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय आणि रोज 2 GB डेटाचा आनंदही घेता येतोय.
BSNL 150 दिवसांचा व्हॅलिडीटी प्लॅन-
बीएसएनएल चा 150 दिवसांचा व्हॅलेडीटी प्लॅन हा 397 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग सह बरेच बेनिफिट्स देखील देण्यात आलेले आहे. तुम्ही या सुविधेचा लाभ फक्त 30 दिवसांसाठी घेऊ शकतात. परंतु 150 दिवसांमध्ये इन्कमिंग कॉल्स मेसेजेसची सुविधा ऍक्टिव्ह राहणार आहे. यासोबतच बीएसएनएल युजर्स साठी 30 दिवसांपर्यंत 2 जीबी डाटा देण्यात येणार असून डेली डाटा लिमिट संपल्यावर 40 kbph स्पीड मध्ये डेटा वापरू शकाल. त्याचबरोबर या प्लॅन मध्ये शंभर एसएमएस सुविधा देण्यात आली आहे.
बीएसएनएल च्या या प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही तुमचे सिम कोणत्याही 150 दिवस अॅक्टिव्ह ठेवू शकता. म्हणजेच जरी 30 दिवसांनी तुमचा रिचार्ज संपला तरी सुद्धा तुमचे बीएसएनएलचे कार्ड 150 दिवस सुरू राहील. ते कधीही डिऍक्टिव होणार नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी हे फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे. याशिवाय जर तुम्ही संपूर्ण वर्षभरासाठी तुमचं सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्याचा विचार करत असाल तर बीएसएनएल तुमच्यासाठी ७९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन घेऊन आलं आहे. प्लॅनच्या माध्यमातून ३०० दिवस तुमचं सिमकार्ड ऍक्टिव्ह राहील आणि यातील ६० दिवस तुम्हाला इंटरनेट आणि कॉलिंग तसेच SMS चा आनंद घेता येईल.