BSNL चा परवडणारा Recharge Plan; दिवसाला 6 रुपये खर्च करून मिळवा 1.5 GB Data

टाइम्स मराठी । स्वदेशी आणि सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवगळे आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. जिओ, एअरटेल आणि VI म्हणजेच वोडाफोन आयडिया या कंपन्यांच्या तुलनेत BSNL चे रिचार्ज आर्थिक दृष्ट्या ग्राहकांना जास्त परवडतात. आता तर बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी असा रिचार्ज प्लॅन आणला आहे जो ३ महिन्यांसाठी चालेल आणि इतर कंपन्यांच्या तुलनेत या रिचार्जची किंमतही अगदी कमी आहे. त्यामुळे एकदा रिचार्ज केला कि नंतर मग ३ महिने त्याकडे बघायची सुद्धा आवश्यकता नाही. आणि मनसोक्त इंटरनेटचा आनंद घ्यायलाही तुम्ही मोकळे. चला तर जाणून घेऊया BSNL चे हे कोणते रिचार्ज प्लॅन आहेत त्याबद्दल ….

BSNL 485 रुपये वाला रिचार्ज प्लान-

BSNL चा या 485 रुपये वाल्या रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 82 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यामध्ये दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा दिला जातो. त्याचबरोबर ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सोबतच दररोज 100 एसएमएस, लोकल आणि एसटीडी कॉल ची सुविधा दिली जात आहे. यामुळे बीएसएनएलचा हा रिचार्ज एकदा मारला कि नंतर ३ महिने रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही. त्याचबरोबर या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला रोजचा फक्त ६ रुपये खर्च येतो. म्हणजेच 162 रुपये प्रति महिना.

BSNL चा 599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलचा 599 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये 84 दिवस व्हॅलिडीटी असेल. या रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला सलग 84 दिवस 252 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येतो. म्हणजे दिवसाला २ जीबी डेटा तुम्ही वापरू शकतात. एवढंच नाही तर या रिचार्ज प्लान मध्ये 100 एसएमएस, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये रोजचा खर्च बघितला तर फक्त 7 रुपये खर्च येतो.