BSNL Recharge Plan : फक्त 48 रुपयांत महिनाभर रिचार्ज; BSNL ची ग्राहकांसाठी खास ऑफर

BSNL Recharge Plan : मित्रानो, आपल्या सर्वाकडेच मोबाईल असून त्याला रिचार्ज करताना मात्र आपल्याला नाकीनऊ येतात. सध्या 5G चे युग असून इंटरनेट सुविधेमुळे रिचार्जच्या किमतीसुद्धा जास्त आहेत. भारतात Jio, Airtel, Vi या टेलिकॉम कंपन्या वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत असतात. परंतु ग्राहकांना मात्र स्वस्त आणि खिशाला परवडणारा रिचार्ज प्लॅन हवा असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅनबाबत सांगणार आहोत. हा रिचार्ज प्लॅन BSNL कंपनीचा असून तुम्ही फक्त 48 रुपयात याचा लाभ घेऊ शकता.

BSNL ही देशातील सर्वात प्रसिद्ध असलेली टेलिकाम कंपनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात कार्यरत असलेल्या या सरकारी टेलिकॉम कंपनीला आता मात्र स्पर्धक कंपन्यांचा सामना करावा लागतोय. म्हणूनच आपला ग्राहकवर्ग जोडून ठेवण्यासाठी तसेच नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही कंपनी वेगवेगळ्यास सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात असते. तुम्ही जर का BSNLचे ग्राहक असाल आणि केवळ आपल्या सिमकार्डला सक्रिय ठेवण्यासाठी एका रिचार्जच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ज्या लोकांना जास्त डेटा आणि कालिंगची गरज असत नाही त्यांना केवळ सिमकार्ड ब्लॉक होण्यापासून वाचवण्याची गरज असते. म्हणून केवळ 48 रु. प्रतिमहिना प्रमाणे शुल्क भरून तुम्ही महिन्याभरासाठी BSNL चे सिमकार्ड जिवंत ठेवू शकता.

BSNL रिचार्ज प्लॅन मध्ये काय सुविधा मिळतेय -BSNL Recharge Plan

BSNL कडून ग्राहकांना मदत पोहोचवण्यासाठी 30 दिवस वैध असलेला रिचार्ज प्लान (BSNL Recharge Plan) उपलब्ध करून देण्यात आला आहे. BSNL ही टेलीकाम कंपनी भारत सरकारकडून चालवली जाते. आणि म्हणूनच ग्राहकांना सोयीस्कर आणि स्वस्त अश्या योजना कंपनीकडून राबवल्या जातात. BSNLच्या ह्या 48 रुपयांच्या कॉम्बो पॅक मधे तुम्ही जास्तीत जास्त वैधतेचा फायदा घेऊ शकता. मात्र यावर इंटरनेट आणि SMS च्या सुविधा दिल्या जाणार नाहीत. म्हणूनच आधीपासून कार्यरत असलेल्या रिचार्ज प्लॅनमधे अधिकाधिक सवलतींचा वापर करून घेण्यासाठी तुम्ही BSNL च्या या प्लॅनची निवड करु शकता. कृपया हे हि लक्ष्यात असुद्या कि हि सवलत राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाणा यांसारख्या प्रदेशांमध्ये उपलब्ध करून दिली जाते म्हणून रिचार्ज करण्याअगोदर तुमच्या विभागात हि सेवा उपलब्ध आहे कि नाही हे तपासून घ्या.