BSNL Recharge Plans : BSNL चा हा रिचार्ज प्लॅन Jio – VI ला देणार जोरदार टक्कर; मिळतोय तब्बल 600 GB Data

BSNL Recharge Plans : BSNL हि देशातील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध अशी टेलिकॉम कंपनी आहे. आता Jio, Airtale, Vi च्या जमान्यात BSNL वरून लोकांचं लक्ष थोडंसं दूर गेलं आहे. मात्र आपल्या ग्राहकांचं लक्ष आकर्षित करून घेण्यसाठी व त्यांना सोयीस्कर अश्या ऑफर्स देण्याचे प्रयत्न BSNL कडून सातत्याने चालू असतात. आताही आपण एका नवीन ऑफर बद्दल जाणून घेऊया जिचा वापर करून BSNL चे ग्राहक योग्य ठिकाणी आपले पैसे गुंतवू शकतात आणि मनसोक्त इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात. चला तर जाणून घेऊयात BSNL च्या या रिचार्ज प्लॅनबाबत

BSNL चा 1999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – BSNL Recharge Plans

सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL ने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक परवडणारा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plans) आणलेला आहे. BSNL च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 1999 रुपये आहे. या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना भरपूर डेटा व OTT सुविधांचा लाभ घेता येईल. या प्लॅन अंतर्गत तुम्हाला 365 दिवस म्हणजेच एका वर्षांसाठी 600GB इंटरनेट वापरण्याची सुविधा मिळेल. तसेच जर तुमचा इंटरनेट डाटा संपला तर त्याचे स्पीड कमी होते व ते 40kbps वर काम करेल. सोबतच BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये Eros Now च्या OTT सर्विसेस मोफत दिल्या जातात, मात्र हि ऑफर केवळ 30 दिवसांपर्यंत मर्यादित असणार आहे. या व्यतिरिक्त प्लॅनमध्ये प्रती दिवसाला 100 SMS सोबत अनलिमिटेड कॉलिंग मोफत मिळणार आहे.

Jio, Vodafone ला टक्कर?:

इतर टेलेकॉम कंपनीजच्या तुलनेत Jio आणि Vodafone ह्या चर्चित व सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कंपन्या आहेत. ते दरवेळी विविध प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून त्यांना आकर्षित करत असतात. मात्र आता BSNL कडून उचलेलं हे पाऊल त्यांना बरीच टक्कर देणार आहे. याचे कारण म्हणजेच Vi आपल्या ग्राहकांना 1999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS प्रती दिवस व 1.5GB इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देतो, शिवाय इथे Bing All Night च्या अंतर्गत रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा दिला जातो. Vi चा हा प्लॅन 250 दिवसांसाठी ग्राह्य आहे. आत्तापर्यंत Reliance Jio प्रत्येकवेळी या शर्यतीत अव्वल ठरत आला आहे, Jio चे ग्राहक देखील इतरांच्या तुलातेक अधिक आहेत. Jio 1499 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 3GB डेटा व प्रती दिवस 100 SMSची सुविधा 84 दिवसांसाठी उपलब्ध करवून देतो, मात्र Jio 5G सर्विसेस देत असल्यामुळे तो नेहमीच सर्वात पुढे असतो. जीवो आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेत BSNLचा रिचार्ज प्लॅन तब्बल वर्षभर असल्याने ग्राहकांसाठी नक्कीच परवडणारा आहे.

असे आहेत BSNLचे इतर प्लॅन :

BSNLचे 10 रुपयांपासून 6,000 रुपयांपर्यंत अनेक रिचार्ज प्लेन्स आहेत. (BSNL Recharge Plans) आपल्याला सोयीस्कर असणारा प्लॅन आपण निवडावा. या सर्वात 1,515 रुपयांचा प्लेन सर्वात जास्त चांगला आहे. हि एक वार्षिक योजना आहे. यामध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधा दिल्या जातात. इंटरनेटचा वापर पूर्ण झाल्यानंतर त्याचा वेग कमी होऊन 40kbps वर काम करता येतं, हा प्लॅन 365 दिवसांसाठी वैध आहे.