Budget 2024 : गुंतवणूकदारांनो!! उद्या बजेट बघताना या 5 गोष्टींकडे दुर्लक्ष मुळीच करू नका

Budget 2024: बजेट ही एक आर्थिक बाब आहे, त्यामुळे गुंतवणूकदर नक्कीच बजेटमधून येणाऱ्या गुंतवणुकीच्या संधींकडे नजर लावून असतील. आज आम्ही तुम्हाला बजेटमधून गुंतवणुकीचा कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात यांबद्दल एक ढोबळ अंदाज देणार आहोत. कदाचित या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक नफा कमावता येऊ शकतो, त्यामुळे या गोष्टी नीट वाचा आणि सदर घटकांकडे उद्याचं बजेट पाहताना नक्कीच लक्ष द्या..

गुंतवणूकदारांनी “इथे” लक्ष देण्याची गरज: (Budget 2024)

उद्या सादर होणारं बजेट सामान्य माणसापासून शेअर बाजारातील प्रत्येकासाठी महत्वाचं असणार आहे, कदाचित बजेटच्या सादरीकरणानंतर गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे काही खास दरवाजे उघडू शकतात, बजेटच्या सादरीकरणानंतर केव्हाही देशात निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळे उद्या येणाऱ्या बजेटकडे दुर्लक्ष करू नका.

१) सरकारी खर्च: उद्या तुम्ही आवर्जून लक्ष द्यावी अशी गोष्ट ती म्हणजे सरकारचा खर्च, या नवीन अर्थसंकल्पातून सरकारला नेमक्या कोणत्या घटकांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे, किंवा कोणत्या क्षेत्रांना सरकारने अधिक निधी दिलाय, याकडे एक नजर असायला हवीच आणि त्यांनतर या क्षेत्रांमधल्या कंपन्यांचे शेअर्स तपासून पहा.

२) सरकारी गुंतवणूक: एक गुंतवणूकदार म्हणून नेहमीच अश्या जागी गुंतवणूक करावी जिथे सरकारचा आधार आहे. त्यामुळे उद्याचा अर्थसंकल्प पाहताना  केंद्र सरकार कोणत्या पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, कृषीव्यवस्था, इन्फ्रा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित चर्चा करेल याकडे लक्ष असुद्या.

३) कराची रक्कम: कर हा प्रत्येक माणसाच्या दृष्टीने महत्वाचा असतो, मग तुम्ही गुंतवणूकदार असाल किंवा नसाल. कर हा सरकार जमा करावा लागतोच, आणि याचा थेट परिणाम आपलया खिश्यावर होतो. म्हणूनच उद्याचं बजेट(Budget 2024) पाहताना सरकार करावर काही सवलत देत आहे का? हो तर नेमक्या कोणत्या कर प्रकारावर सरकार उदार झालंय हे नीट जाणून घ्या.

४) सरकारी धोरण: सादर करण्यात येणाऱ्या बजेटमधून सरकारचे नेमके काय धोरण प्रस्तुत होईल याकडे लक्ष द्या. सरकार कुठे मेहेरबान आहे आणि कोणत्या क्षेत्रांकडे जास्ती जोर दिलेला नाही याबद्दल माहिती मिळवा.

५) लाभप्राप्तीची क्षेत्रे: उद्याच्या बाजेटमध्ये सरकार कोणत्या क्षेत्रांकडे अधिक वाळलेलं आहे. आर्थिक विकासासाठी सरकार कोणते धोरण राबवू शकते याकडे लक्ष द्या. तसेच शेअर बाजारात कोणत्या क्षेत्रातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल, यावर लक्ष असुद्या.