Budget 2024 : आता काही दिवसांतच देशात अर्थ मंत्रालयाकडून नवीन आर्थिक वर्षाच्या काही काळासाठी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीतील हा सर्वात शेवटचा अर्थसंकल्प असेल. मात्र निवडणुकीच्या कालखंडात येणाऱ्या अर्थसंकल्पामुळे कार्यरत सरकार तसेच इतर मतदार संघावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणूनच हा अर्थसंकल्प काही काळासाठी मर्यादित केला गेलाय, आणि याला अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) असं म्हटलं जातंय. सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 51,000 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते पण हा आकडा अजून खूप दूर आहे कारण आता सरकार बदलण्यात जेमतेम दोन महिने बाकी उरले आहेत. अशा स्थितीत यंदाही सरकारचे उद्दिष्ट कमी पडण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार आपल्या टार्गेट पासून दूर आहे का? (Budget 2024)
गेल्या वर्षी देशात अर्थसंकल्प सादर करताना कार्यरत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 51 हजार कोटी रुपये निर्गुंतवणुकीतून (disinvestment) उभे केले जातील अशी घोषणा केली होती, त्याप्रमाणेच आत्तापर्यंत सरकार केवळ 12,504 हजार कोटी रुपये तयार करू शकली आहे याचाच अर्थ कार्यरत सरकार ठरवलेल्या उद्देशापासून 25 टक्क्यांपेक्षाही अनेक पावलं मागे आहे.
याच्याही आधी म्हणजेच आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सरकारने निर्गुंतवणुकीमधून 65 हजार कोटी रुपये उभे करण्याचं ध्येय ठरवलं होतं त्यापैकी केंद्र सरकार केवळ 35,293 हजार कोटी रुपये जमा करण्यात यशस्वी झालं होतं. एवढंच नाही तर मोदी सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या अंदाजात कमालीची कपात केली होती, ती 1.75 लाख कोटींवरून 78,000 कोटी रुपयांवर आणली होती, परंतु सरकारला 78,000 कोटी रुपयांचे सुधारित लक्ष्य सुद्धा गाठता आले नाही. 2021-22 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून सरकारला एकूण 13,534 कोटी रुपये मिळाले होते. देशात त्यावेळी कोरोनाचा संकट असल्यामुळे सरकार ठरवलेला उद्देश पूर्ण करू शकलं नाही अशी उत्तरं देण्यात आली होती, मात्र निर्गुंतवणुकीचा उद्देश पूर्ण करण्यास सरकार याआधी देखील अनेक वेळा नापास ठरलं आहे.