Budget 2024 : अर्थमंत्रालयाकडून सादर होणाऱ्या बजेटमध्ये 9 जणांचा सहभाग; मात्र ही नवरत्न आहेत तरी कोण?

Budget 2024 : येत्या दोन दिवसांत देशात अर्थसंकल्प सादर केला जाईल, आणि मोदी सरकारच्या कारकिर्दीतील हा शेवटचा अर्थसंकल्प असेल तर निर्मला सीतारामन यांच्या अर्थमंत्री म्हणून एकूण कार्यावळीतील हा सहावा अर्थसंकल्प असेल. दोन सत्ता बदलत असताना तयार होणारा हा महत्वाचा दस्तऐवज ठरेल. मात्र हा अर्थसंकल्प काय अर्थमंत्री एकट्याच बनवतात का? त्यांची एक टीम असेलच ना!! मग या गटात नेमक्या कोणाची नावं सामील आहेत हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? देशासाठी अर्थसंकल्प तयार कारण ही काही एका दिवसांत तयार होणारी गोष्ट नाही आणि याचा परिणाम अनेक लोकांवर होणार असतो म्हणून इथे घेतले जाणारे सर्व निर्णय विचार्पूर्वकच असले पाहिजेत..

निर्मला सीतारामन यांची एकूण सेना कशी आहे? (Budget 2024)

देशाच्या अर्थमंत्री मोदी सरकारच्या अंतर्गत 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प प्रस्तुत करतील, मात्र हा अर्थसंकल्प तयार करण्यात नेमकी किती लोकं सामील आहेत, त्यांची नाव काय आणि ते नेमकी कोणती जबाबदारी सांभाळतात हे पाहुयात. निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली एकूण 9 लोकं अर्थसंकल्प तयार करीत होते, म्हणून या सर्वांना अर्थमंत्र्यांची नवरत्न म्हणावी लागतील. अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या सीतारामन या संपूर्ण गटाचे नेतृत्व करीत आहेत आणि याच अनुषंगाने देशासमोर अर्थसंकल्प वाचण्याचं काम स्वतः अर्थ मंत्री करतील.

त्यांच्या व्यतिरिक्त हा अर्थसंकल्प तयार करण्यात एकूण 9 नावं सामील आहेत. पैकी सर्वात आधी येतात तामिळनाडूचे IAS टीवी सोमनाथ, जे आत्ताच्या घडीला अर्थ मंत्रायलचे सिनियर सेक्रेटरी आहेत आणि ते फायनान्स सेक्रेटरी म्हणून जबाबदारी पार पडतात, त्यांनी Economics या विषयात PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर अजय सेठ हे अर्थमंत्रालयात सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत, या अगोदर त्यांनाही वर्ष 2021 मध्ये देखील अर्थसंकल्प बनवण्यात भाग घेतला होता. तिसरी व्यक्ती आहे तुहिन कांता पांडे, यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीत एकूण 5 वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती आणि आता देखील ते या गटाचा महत्वपूर्ण भाग आहेत(Budget 2024).

संजय मल्होत्रा, विवेक जोशी, वी अनंत नागेश्वरन, संजय कुमार अग्रवाल, आशीष वछानी आणि नितिन गुप्ता ही बाकी नावं आहेत. यातील प्रत्येक माणूस हा आर्थिक घटकाशी या ना त्या प्रकारे जोडलेला असून आत्तादेखील ते वेगवेगळी जबाबदारी सांभाळत आहेत. पैकी संजय मल्होत्रा यांच्या खांद्यांवर टेक्स रेव्हेन्यूची धुरा दिलेली आहे. विवेक जोशी हे रजिस्टर जनरल आणि जनगणना कमिश्नर म्हणून कार्यरत होते आणि वी अनंत नागेश्वरन हे आपल्या देशाचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळतात. इथे काही जबाबदाऱ्या नमूद केलेल्या जरी नसल्या तरी या गटातील प्रत्येक माणूस हा अर्थसंकल्प बनवण्यासाठी पूर्णपणे सक्षम असल्याने एकूण अर्थसंकल्पातून परिणाम काय निघतो हे पाहावं लागेल.