Budget 2024: काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशात त्यांच्या कारकिर्दीतील सहावं बजेट प्रस्तुत केलं. अनेकांना या बजेटकडून मोठमोठाल्या अपेक्षा होत्या मात्र सरकारने काही काळ अगोदरच या बजेटकडून कोणत्याही मोठ्या अपेक्षा ठेऊ नये अशी मागणी केली होती. तरीही कालच्या बजेटमधून काही खास आणि महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आणि अमित शाहा यांनी या घोषणांचे तोंड भरून कौतुक केले आहे. काय म्हणाले अमित शाहा चला मग जाणून घेऊया…
बजेटबद्दल काय म्हणाले अमित शहा? (Budget 2024)
कालच्या बजेटमध्ये मोदी सरकारकडून विकसित भारतावर सर्वाधिक भर देण्यात आली, त्यांनी केलेल्या सर्व घोषणा या जवळपास विकसित भारत या विषयाच्या आसपास वावरणाऱ्या आहेत आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी देखील हाच मुद्दा उचलून धरत मोदी सरकारचे कौतुक केले आहे. मोदी सरकार कुणा एकाच क्षेत्रावर भर देऊन कार्य करत नाही तर देशाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून गेल्या 10 वर्षांपासून सरकारचे प्रयत्न सुरु आहेत असे ते म्हणाले.
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा कोणत्या?
मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताची कल्पना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नवीन संधी निर्माण होतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. याचबरोबर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठीही अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी प्रोत्साहन आणि दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज राज्यांना देण्यात येणार आहे, यामुळे पर्यटन क्षेत्राची अर्थव्यवस्था बळकट होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
अमित शाह यांनी लक्षद्वीप आणि इतर बेटांसाठी हवाई दळणवळण सुरू करून त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हे बेट आता विमानाने भारताच्या मुख्य भूभागाशी जोडले जाणार आहेत, ज्यामुळे पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल आणि या बेटांवर राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. याचबरोबर, शाह यांनी ‘सूर्योदय योजना’ साठीही पंतप्रधानांचे कौतुक केले(Budget 2024). ही योजना एक कोटी कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवून वीज निर्मिती करण्यास मदत करेल, यामुळे त्यांना दरमहा 300 युनिट वीज मोफत मिळेल आणि त्यांची वर्षाला 15,000 ते 18,000 रुपयांची बचत होईल आणि सर्वात शेवटी अमित शाहा यांनी आयुष्मान भारताचा उल्लेख करत मोदी सरकारच्या या बजेटला विकसित भारताचा आराखडा म्हटलं आहे .