Budget 2024 : आत्ताच्या घडीला सर्वात चर्चा सुरु असलेला एकमेव विषय आहे तो म्हणजे अर्थसंकल्प. अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक स्थितीला अधीक मजबूत करण्याचे काम करतो. बजेट म्हणजे काय तर नियोजन, आर्थिक नियोजन. कोणत्या क्षेत्राला किती पैश्यांची गरज आहे त्याप्रमाणे पैश्यांचे वाटप केले जाते आणि मग ती मंत्रालये पुढे वर्षभर यात आपला खरच भागवतात. जसं तुम्हाला माहिती आहे, येणाऱ्या बजेटकडून अनेकांना विविध अपेक्षा आहेतच. मग या नेमक्या अपेक्षा कोणत्या हे आज उलघडून पाहुयात..
येणाऱ्या बजेटकडून विविध अपेक्षा कोणत्या? (Budget 2024)
आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या काय आहे माहिती आहे का? बेरोजगारी. आपण म्हणतो की तरुण आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत, मात्र त्या तरुणांना पुरेसा रोजगारच नसेल तर त्यांनी करावं काय आणि जावं कुठे? म्हणूनच येणाऱ्या बजेटकडून देशातील याच बेरोजगार वर्गाला काही विशेष योजना अमलांत आणल्या जाण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आपल्या देशात सार्वधिक प्रमाणात वावरणारी जनता म्हणजे मध्यमवर्गीय कुटूंब. या सर्वांना येणाऱ्या बजेटमधून काही अंशी महागाईपासून सुटका करणाऱ्या घोषणांची अपेक्षा वाटत आहे.
आपलं कार्यरत सरकार आत्मनिर्भर भारतावर लक्ष केंद्रित करून वावरत आहे, आत्मनिर्भर भारतामुळे देशातील कैक तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली आणि परिणामी देशाची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी सुधारली. आता याच व्यावसायिकांना येणाऱ्या बजेटमधून सरकार मिळणाऱ्या सब्सिडीत काही टाक्यांची वाढ करेल का अशी अपेक्षा लागून राहिली आहे, काहींच्या मते सरकार यावेळी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत NREGS ची रक्कमही वाढवू शकते. शिवाय रेल्वे, Infrastructure आणि सौरक्षण विभागात सरकारकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील अशी चिन्ह दिसतायत.
इन्कम टेक्समध्ये (Income Tax) सूट मिळेल का?
देशातील प्रत्येक कमावत्या नागरिकाला सरकारला कर हा भरावाच लागतो आणि नेहमीच आपण सरकारकडून इन्कम टेक्समध्ये घट केली जावी अशी अशा धरून असतो. काही लोकांच्या मते येणाऱ्या बजेटमधून सरकार इन्कम टेक्सची रक्कम कमी करू शकते, आणि जर का अशी खरोखर घोषणा झाली तर याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्ग्य जनतेला होणार आहे. कदाचित अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी इन्शोरन्सच्या (Insurance) बाबतीत महत्वाचा निर्णय घेऊ शकतात, म्हणूनच येणाऱ्या बजेटमधून (Budget 2024) विमा पॉलिसीमधून GST ला हटवलं जाईल अशी अपेक्षा केली जाऊ शकते, यामुळे काय होईल तर अधिकाधिक लोकं इन्शुरन्सकडे वळतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा फायदा होईल.