Budget 2024 : 1 फेब्रुवारी रोजी देशात अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अख्त्यारीखाली येणाऱ्या अर्थ मंत्रालयाकडून सादर करण्यात येणारं हे शेवटचं बजेट असणार आहे. देशभरातून अनेकांना या बजेट कडून काही ना काही विशेष घोषणा करण्यात येतील अशी आशा वाटत आज आणखीन एक मजेदार बातमी समोर आली. आजच समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या बजेटमध्ये नवीन आर्थिक वर्षासाठी शेती उत्पादनात 22 ते 25 लाख कोटी कृपया पर्यंत कृषी कर्जाची रक्कम वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते, चालू आर्थिक वर्षासाठी सरकारचे कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपये आहे आणि येणाऱ्या काळात कृषिप्रधान भारताला आणखीन वृद्धिंगत करण्यासाठी सरकार हे फेरबदल करू शकते.
नवीन बजेटमध्ये कृषी कर्जाची रक्कम वाढेल का?(Budget 2024)
अनेक जणांना नवीन अर्थसंकल्पामधून देशात विविध बदल घडून येतील अशी अपेक्षा वाटत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नवीन अर्थसंकल्पामध्ये सरकार देशांतर्गत दिल्या जाणाऱ्या कृषी कर्जाची रक्कम देखील वाढवू शकते. आत्ताच्या घडीला केंद्र सरकारकडून वित्तीय संस्थांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 2 टक्के व्याज सवलत दिली जाते, याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांना एखाद्या वर्षात 7 टक्के सवलतीच्या दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज दिले जाते. तसेच वेळेवर पेमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला 3 टक्के अतिरिक्त व्याज सवलतही दिली जाते. आपल्याकडे शेतकरी दीर्घ काळासाठी देखील कर्ज घेऊ शकतात, मात्र त्यावर लागणाऱ्या व्याजाची रक्कम बाजारी घटकानुसार बदलू शकते.
आता येणाऱ्या अर्थसंकल्पामधून आर्थिक वर्ष 2024-25 साठी कृषी कर्जाची रक्कम 22 ते 25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते अश्या चर्चा केल्या जात आहेत. आतापर्यंत देशभरातील ज्या शेतकऱ्यांना या सुविधांचा लाभ मिळत नाही त्या सर्वांना प्रकाशात आणून त्यांच्यापर्यंत ही रक्कम पोहोचवली जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. देशांतर्गत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि कृषी मंत्रालय वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत असतात. आपण जर का सरकारी आकडे तपासून पाहिले तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 82 टक्के शेतकऱ्यांना 20 लाख कोटी रुपयांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्यात आली आहे. सरकारी तसेच खाजगी बँकांकडून जवळपास 16.37 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. नवीन अर्थसंकल्पाच्या आधारे(Budget 2024) नव्या आर्थिक वर्षात सरकारला अधिकाधिक मोठा पल्ला गाठायचा असल्याने सरकार येणाऱ्या अर्थसंकल्पामधून विशेष बदल करण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.