Budget 2024 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेटबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आर्थिक वर्ष 2024-25 साठी बजेट फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला सादर केलं जाईल. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरु असून अद्याप अंतिम मतदानाच्या तारखा जाहीर झालेलय नाहीत. सीतारामन यांनी CII च्या ग्लोबल इकॉनॉमिक पोलिसी फोरम मध्ये बोलताना माहिती दिली कि फेब्रुवारी महिन्यात सादर केलं जाणारं बजेट केवळ ‘वोट ऑन अकाउंट’च्या स्वरूपात (वोट ऑन अकाउंट म्हणजे वित्तमं सरकारला पगार आणि चालू खर्चासाठी अत्यावश्यक सरकारी खर्चासाठी मंजुरी मिळवून देणे, यात मोठे बदल किंवा विशेष धोरणांचा समावेश केला जात नाही. सार्वत्रिक निवडणुकांनंतर सादर होणारे हे बजेट साधारण दोन महिन्यांसाठी वैध मानले जात असेल. नवीन सरकार जबाबदारी हाती घेईपर्यंत या बजेटचा वापर केला जाईल, किंवा तोपर्यंत देशाचे कामकाज चालू राहावे म्हणून हे बजेट सादर केले जाणार आहे. त्यामुळे या बजेटमध्ये काही मोठे बदल केले जातील अशी अपेक्षा नागरिकांनी ठेऊ नये. देशाच्या पुढील आर्थिक वर्षासाठी जुलै महिन्यात नियमित बजेट प्रस्तुत केले जाणार आहे.
निर्मला सीतारामन सादर करणार 6 वे बजेट: (Budget 2024)
निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर बजेट सादर करण्याची हि त्यांची सहावी वेळ असणार आहे. देशाच्या घडामोडी चालू राहण्यासाठी गरज असते ती पैश्यांची आणि नियोजनाची. आपल्या घरातील खर्चाचे जसे आपण नियोजन करतो जेणेकरून येणाऱ्या काळात आर्थिक संकटांचा सामना करावा लागू नये. त्याचप्रमाणे देशाचे कामकाज चालवण्यासाठी नियोजनाची गरज असते. या नवीन बजेटमध्ये (Budget 2024) सरकार व्यवसाय सुलभ करणे, देशांतर्गत नवकल्पना आणि घासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे यावर अधिक लक्ष्य केंदीर्त करणार आहे. नवीन बजेटच्या माध्यमातून देशांतर्गत चालणाऱ्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असेल, तसेच यांना चालना देण्यासाठी सरकार अधिकाधिक योजना राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.
या बजेटमध्ये मोठ्या घोषणा नाहीत:
सध्या देशात मतदानाचं वारं वाहत आहे. आणि लवकरच नवीन सरकार देशाची सूत्र आपल्या हाती घेईल. अश्या परिस्थतीत सध्या प्रस्तुत केलं जाणारं हे बजेट (Budget 2024) किरकोळ दिवसांसाठी ग्राह्य धरलं जाईल. बजेटमध्ये सामान्यतः खर्च, महसूल, वित्तीय सूट,आर्थिक कामगिरी आणि आगामी महिन्यांसाठीचे अंदाज सामावलेले असतात. मात्र आता सरकार बदलणार असल्याने येणाऱ्या नवीन सरकारवर आश्वासनांचा बोजा पडू नये म्हणून या बजेटमध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यात येणार नाहीत. तसेच सादर केलेल्या बजेटमुळे विद्यमान सरकारच्या बाजूने मतांवर प्रभाव पडू शकतो. कार्यरत सरकारला अंतरिम अर्थसंकल्पासह बजेट सादर करण्याची परवानगी नसते अश्या अनेक कारणांमुळे सीतारामन यांच्या यंदाच्या बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्या जाणार नाहीत.