Budget 2024: आज केवळ 60 मिनिटात सादर झाला अर्थसंकल्प; मात्र जाणून घ्या निर्मला सीतारामन यांचा “तो” अनोखा रिकॉर्ड

Budget 2024: आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाबद्दल आपण थोडक्यात पण महत्वाची माहिती मिळवली. आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प होता, काही काळासाठी वैध असणारा आहे. परिणामी हा अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सुद्धा कमीच होती.चला मग आज जाणून घेऊया की आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची वेळी किती होती आणि इतर वेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी किती वेळ घेऊन सादर केला होता अर्थसंकल्प…

अर्थसंकल्प किती वेळात सादर होतो? (Budget 2024)

आज सकाळीच नवीन संसद भवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. एक तर नवीन संसद भवनात सादर करण्यात आलेला हा पहिलाच अर्थसंकल्प होता, आणि या दरम्यान अर्थमंत्रालयाकडून मोठाल्या घोषणा करण्यात आल्या नसल्या तरीही जुन्या योजनांवर भर टाकण्यात आली होती, आणि दरम्यान काही विशेष घोषणा देखील झाल्या.

मात्र तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात सर्वात अधिक वेळ घेऊन बजेट प्रस्तुत करण्याचा रेकॉर्ड अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याच नावी रुजू झालेला आहे. वर्ष 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वात मोठं बजेटचं भाषण दिलं होतं, कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही पण ते एका बॉलीवूड चित्रपटापेक्षाही अधिक वेळ चाललं, त्यावर्षी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत तब्बल 2.42 तासांचे बजेट भाषण केलं होतं आणि आज त्याच्या एकदम विरुद्ध टोकाला पडकून अर्थमंत्र्यांनी केवळ 60 मिनिटात सगळंच बजेट(Budget 2024) आटोपतं घेतलं.

याआधी किती वेळ घेऊन केला होता अर्थसंकल्प सादर?

2019 मध्ये नवीन अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांनी 2 तास 17 मिनिटे बोलून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांच्या आधीच्या काही अर्थमंत्र्यांनी केलेल्या भाषणांच्या तुलनेत हा काळ खूपच जास्त होता. पुढे 2020 मध्ये सीतारामन यांनी आणखी एक रेकॉर्ड तोडला. त्यांचे भाषण 2 तास 42 मिनिटे चालले, जे भारतातील सर्वात मोठे अर्थसंकल्पचे भाषण बनले होते. 2022 मध्ये सीतारामन यांनी त्यांची लांबी कमी केली आणि 1 तास 31 मिनिटे बोलल्या. परंतु 2023 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा 1 तास 25 मिनिटे बोलून आपल्या भाषणाची लांबी वाढवली होती.

सीतारामन यांच्या अर्थसंकल्प भाषणांची लांबी कमी-अधिक होत असली तरी, त्यांची स्पष्टता आणि संक्षिप्तता नेहमीच कौतुकास्पद असते. ते आपल्या भाषणात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यास आणि त्यांचे समर्थन करण्यासाठी ठोस पुरावे देण्यास त्या नेहमीच सक्षम असतात(Budget 2024). सीतारामन यांच्या अर्थसंकल्प भाषणांची लांबी ही त्यांच्या कार्यशैलीची एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे. त्या एक कुशल आणि अनुभवी अर्थमंत्री आहेत आणि आपल्या भाषणातून महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वेळ घेऊन त्या सर्व मुद्यांची व्यवस्थित मांडणी करतात.