Budget 2024 Time: सध्या “बजेट,बजेट” अशी चर्चा सर्वात सुरु आहे खरी पण हे बजेट पाहायचं कुठे? आणि किती वाजता? तुमच्याही मनात हेच प्रश्न असतील तर अजिबात काळजी करू नका, कारण तुम्ही अगदी योग्य वेळेला हा प्रश्न उभा केला आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. या बजेटचा आराखडा पाहून येत्या तीन महिन्यांसाठी सरकारने पैसे नेमके कश्या प्रकारे विभागले आहेत याची इतंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल, सामान्य जनतेला सत्तापालटापूर्वी सरकार मदत करणार का? हे देखील आता काही तासांतच सिद्ध होणार आहे.
बजेटची वेळ काय, आणि हे पाहावं कुठे? (Budget 2024 Time)
उद्या आपल्याला देशाच्या आर्थिक बाजूची तपशीलवार माहिती मिळणार आहे. देश कुठे उत्तम कामगिरी बजावतोय, कुठे पैसे अधिक प्रमाणात खर्च होत आहेत या सर्व घटकांवर अर्थमंत्र्यांकडून व्यवस्थित उत्तरं दिली जातील. पण हा अर्थमोहोत्सव कुठे आणि कधी पाहावा याची माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही देशातील एका मोठ्या पडावाला हुलकावणी देणार आहात. आपण देशात कोरोना महामारीनंतर डिजिटल बजेटचा वापर करतो, त्यामुळे आता जाणून घेऊया बजेट सादर होण्याची वेळ असेल तरी काय…
आजपासून देशात बजेट सत्राची सुरुवात झाली, जिथे देशाच्या पंतप्रधांनीं आणि राष्ट्रपतींनी मतं मांडली होती. हे सत्र 9 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे. आपल्याकडे वर्ष 1999 पासून बजेट सादर करण्याची वेळ बदलून सकाळी 11 वाजता करण्यात आली आहे, जी की अगोदर संध्याकाळी 5 अशी होती, त्यामुळे जर का तुम्हाला बजेट सादरीकरणाचे थेट प्रक्षेपण पाहायचे असेल तर सकाळी 11 वाजता कोणत्याही News Channel द्वारे तुम्ही याबद्दल माहिती मिळवू शकता.
किंवा तुम्ही मोबाईल एपचा वापर करून बजेटची माहिती गोळा करू शकता www.indiabudget.gov.in इथून डाउनलोड करता येणाऱ्या एपमध्ये तुम्ही हिंदी तसेच इंग्रजीमधून बजेटबद्दल माहिती जाणून घेऊ शकता(Budget 2024 Time). याशिवाय पत्र सूचना कार्यालय(PIB) यांच्याद्वारे उद्या बजेटचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, तुमची सोशल मीडिया देखील संबंधित माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि Union Budget Mobile App वर बजेट पाहता येईल.