Budget 2024: आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशासमोर अंतरिम बजेट प्रस्तुत करीत आहेत, या भाषणाची सुरूवात त्यांनी गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारच्या सकारात्मक बदलांना मांडत केली, त्यांच्या मतानुसार गेल्या दहा वर्षांत भारताची अर्थव्यवस्था बरीच मजबूत झाली आहे. आज निर्मला निर्मला सीतारामन नवीन संसदत भवनात पहिल्यांदा बजेट प्रस्तुत करीत आहेत. बजेट प्रस्तुतीकरणानंतर आपण सर्व मुद्यांचा सखोल आढावा घेऊ..
भारतात सुरु आहे बजेट सादरीकरण: (Budget 2024 Update)
आज नवीन संसदत भवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या कारकिर्दीतील सहावं बजेट प्रस्तुत करत आहेत, हे अंतरिम बजेट असलं तरीही येणाऱ्या तीन महिन्यांसाठी भारताचा आर्थिक पाया कसा असेल याचा आज अंदाज येणार आहे. आज भाषणाची सुरुवात करताना मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीवर नजर फिरवली. “सबका साथ, सबका विकास” या धोरणांतर्गत मोदी सरकार वाटचाल करीत आहे आणि याचाच सकारात्मक परिणाम विविध क्षेत्रांवर झालेला दिसून आलाय. तसेच मोदी सरकारने आतपर्यंत ग्रामीण विकास, जल योजना, गॅस सिलिंडर, आवास आणि बँकिंग क्षेत्रात सरकारने बऱ्यापैकी बदल घडवून आणले आहे. सरकारने आतपर्यंत जवळपास 80 कोटी लोकांना निशुल्क धान्य प्रदान केली आहेत.
अश्याच प्रकारे आर्थिक सुधारणा करीत राहिलो तर येणाऱ्या काही काळात आपण मोदी सरकारच्या अंतर्गत बरीच सुधारणा झालेली पाहायला मिळेल. वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार झालेलं असेल. मोदी सरकार मोठ्या प्रमाणात गरीब, महिला, शेतकरी यांना मदत करण्याचे काम करीत आहे. देशातील शेतकऱ्यांचं भलं करणं हे भारत सरकारचे पहिले उद्दिष्ट आहे. एवढंच नाही तर मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीच्या जाळ्यातून बाहेर काढलं आहे. प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत आत्तापर्यंत 3 कोटी घरं बनवण्यात आली आहेत आणि येणाऱ्या 5 वर्षात सरकार आणखीन 2 कोटी घरं बनवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे(Budget 2024 Update). यासोबतच देशातील लखपती दीदींना आर्थिक मदत पोहोचवण्याचा आकडा वाढवण्यात येणार आहे.