Budget 2024: रेल्वे प्रवाशांसाठी बजेटमधून खास घोषणा; रेल्वे कोचचे रूपांतर वंदे भारतप्रमाणे होणार

Budget 2024: आज सकाळीच देशाच्या अर्थमंत्रालयाकडून अर्थसंकलप सादर करण्यात आला, हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्याची वैधता ही केवळ 3 महिन्यांसाठीच आहे. ज्याप्रकारे अर्थसंकल्पाची जोरदार चर्चा सुरु होती, त्याला साजेशी मांडणी काही यातून झालेली पाहायला मिळाली नाही. तरीही निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या वतीने काही महत्वाच्या घोषणा नक्कीच केल्या, यातीलच एक घोषणा रेल्वे प्रवाश्यांसाठीची आहे, ती काय हे आज जाणून घेऊया…

अर्थमंत्र्यांची रेल्वे प्रवाशांसाठी खास घोषणा? (Budget 2024)

जसं आप्ल्यालाल माहितीच आहे, मोदी सरकारच्या अंतर्गत यंदा वंदे भारत एक्सप्रेस ही बलाढ्य रेल्वे सुरु करण्यात आली होती. वंदे भारतच हा प्रवास सर्वांसाठी आरामदायक ठरत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र आज घेतल्यात आलेल्या निर्णयानुसार भारत सरकार देशातील रेल्वेचे कोच सुद्धा वंदे भारत प्रमाणे आलिशान बनवण्याच्या मार्गावर आहे. आता भारतीय रेल्वेचे 40 हजार नॉर्मल रेल कोच वंदे भारतमध्ये बदलण्यात येणार आहे.

देशातील रेल्वे प्रवासात हे बदल करण्याचे प्रमुख कारण काय? तर, बाकी अनेक घटकांप्रमाणे रेल्वे सुद्धा देशाच्या विकासात हातभार लावते, आणि यामुळेच रेल्वेच्या सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या जात आहेत. किंबहुना नवीन रेल्वे सुरु केल्या जात आहेत. भारतीय रेल्वे प्रवासाचा होणारा कायापालट आपण पहिला, वंदे भारत हा त्यातील महत्वाचा बदल म्हणावा लागेल. अर्थमंत्र्यांच्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेन आता चेअर कार प्रमाणे स्लीपर कोचही करण्यात येणार आहे, जी रेल्वे राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही अधिक आरामदायक आणि सुविधाजनक प्रवासाचा आनंद मिळवून देईल.

आपल्या भारतात 15 फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारताची सुरुवात करण्यात आली होती, तेव्हा ही रेल्वे नवी दिल्ली ते वाराणसी असा प्रवास करायची. हळूहळू देशात वंदे भारताची पसंती वाढू लागली आणि तिने विविध मार्गांवरून प्रवास करायला सुरुवात केली. आत्ताच्या घडीला चेन्नई-म्हैसूर, चेन्नई-तिरुनलवेली, चेन्नई-कोयंबट्टूरर, तिरुवनंतपूरम-कासरगोड, चेन्नई-विजयवाडा अश्या ठिकाणी धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये विमानांप्रमाणे सुविधा दिल्या जात आहेत, आणि लवकरच वंदे भारत आणि इतर रेल्वेचे चित्र बदलण्यासाठी सरकार मार्गक्रमण (Budget 2024) करेल.