Budget 2024: विकसित भारतासाठी राज्यांना मिळणार मोठी मदत! 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज, एकूण रक्कम 75,000 कोटी!

Budget 2024: आज अर्थमंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या बजेटमधून नाही म्हटलं तरीही विविध प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र लक्ष्यात असुद्या हे बजेट काही संपूर्ण आर्थिक वर्षासाठी वैध असणार नाही, आता मे महिन्यात होणाऱ्या सत्तापालटानंतर नवीन सरकारच्या अंतर्गत संपूर्ण वर्षासाठी नवीन बजेटची आखणी करण्यात येणार आहे. अंतरिम अर्थसंकल्प असला तरीही या बजेटमधून काही विशेष घोषणा नक्कीच करण्यात आल्या, यामधील एक प्रमुख घोषणा होती देशातील राज्यांना 50 वर्षांसाठी देण्यात येणारं 75000 कोटी रुपयांचं Interest Free Loan. काय आहे एकूण बातमी जाणून घेऊया…

मोदी सरकारला हवाय विकसित भारत: (Budget 2024)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेटच्या भाषणात सरकारच्या विकसित भारत बनवण्याच्या स्वप्नाबद्दल सखोल माहिती दिली. विकसित भारत बनवायचा असेल तर देशांर्गत येणाऱ्या प्रत्येक राज्याला विकासाची जोड देण्याची गरज आहे आणि म्हणूनच ही गतिमानता प्रस्तापित करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. या घोषणेत सीतारामन म्हणाल्या की येणाऱ्या 50 वर्षांसाठी देशातील राज्यांना 75000 कोटी रुपयांचं Interest Free Loan दिली जाणार आहे, यामुळे काय होईल तर विविध राज्यांना त्यांची परिस्थिती सुधारायला मदत मिळेल आणि एकंदरीत भारताचे चित्र पालटून जाईल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच घोषणा केली की, राज्यांना केंद्राकडून मिळणारी मदत या वर्षीही कायम राहील. यामुळे राज्यांना विकासाच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता मिळेल. गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय भाषणात, सीतारामन यांनी भांडवली गुंतवणुकीबाबत राज्यांना विशेष सहाय्य योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत सरकारने एकूण 1.3 लाख कोटी रुपयांपर्यंतची रक्कम 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज म्हणून देण्याची घोषणा केली होती. ही योजना राज्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची आहे. या योजनेमुळे राज्यांना रस्ते, रेल्वे, विमानतळ, ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यास मदत होईल.

2047 पर्यंत भारत बनणार विकसित राष्ट्र:

यावेळी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी आधारभूत संशोधन आणि विकासासाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. यासाठी सरकार 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. ही तरतूद सूर्योदय योजनांमध्ये केली जाईल. सूर्योदय योजनेमध्ये 10 प्रमुख क्षेत्रांचा समावेश असेल आणि या अंतर्गत संशोधन आणि विकासासाठी खासगी क्षेत्राला विविध प्रकारचे प्रोत्साहन दिले जाईल.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल(Budget 2024). यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये आधारभूत संशोधन आणि विकासाला मोठे महत्त्व आहे. आधारभूत संशोधन आणि विकासामुळे भारताला नवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्यात मदत होईल. यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होणार असून आपला देश जागतिक महासत्ता म्हणून उदयास येईल.