Budget 2024 : आता 8 लाख रुपयांपर्यंत इन्कम टॅक्सची भीती नाही? सरकार बजेटमधून घेईल का मोठा निर्णय?

Budget 2024: एक फेब्रुवारी रोजी देशात अर्थ मंत्रालयाकडून इंट्रीम बजेटची घोषणा केली जाणार आहे. देशात निवडणुका लागणार असल्याने सादर होणाऱ्या या बजेटकडून कुठल्याही मोठ्या बदलांची अपेक्षा करू नये असा संदेश सध्या कार्यरत असलेल्या सरकारकडून जनतेला देण्यात आला होता. मात्र या परिस्थितीत सुद्धा कदाचित येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेला खुश करण्यासाठी केंद्र सरकारकडून काही विशेष सवलती उपलब्ध करून देण्यात येतील, अशी आशा अनेक जणांना वाटत आहे. येणाऱ्या बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेत (PM Kisan Yojana) काही विशेष टक्क्यांची वाढ केली जाईल अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे, आणि आता एवढेच नाही तर येणाऱ्या बजेट मधून न्यू टॅक्स रीजीम अंतर्गत एक्स रिबेटची मर्यादा वाढवली जाईल अशी अपेक्षा केली जात आहे.

देशवासीयांना Budget 2024 कडून अपेक्षा:

1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचं बजेट सादर करतील. आणि यामधून केवळ शेतकरीच नाही तर करदात्यांना देखील काही आनंदाची बातमी मिळेल का? अशी धाकधूक लागून राहिली आहे. काही जणांच्या मते नवीन इन्कम टॅक्स रिजिमच्या अंतर्गत करावर मिळणारी सूट 7.5 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या सरकारकडून देशभरात इन्कम टॅक्स भरणाऱ्या कर दात्यांना 7 लाख रुपयांची मर्यादा लावण्यात आली आहे. आता जनतेला असलेल्या अपेक्षांची जर का सरकारकडून पूर्तता झाली तर यानंतर 8 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. गेल्यावेळी अर्थ मंत्रालयाने इन्कम टॅक्सची मर्यादा पाच लाखां वरून सात लाख रुपयांपर्यंत वाढवली होती, तसेच इन्कम टॅक्स स्लॅबची आकडेवारी 7 टक्क्यांवरून घटवून 6 टक्क्यांवर आणण्यात आली होती.

देशभरात इन्कम टॅक्सचे अनेक कर‌दाते आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या अपेक्षांप्रमाणे सरकारने बजेट मधून इन्कम टॅक्स लागू होणाऱ्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवली तर या सर्वांना दिलासादायक बातमी मिळू शकते. देशातील सामान्य जनतेला फायदा करवून देण्यासाठी, या निवडणुकींचे अवचित्य साधून सरकार काही विशेष बदल घडवून आणू शकते. 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणाऱ्या बजेटमध्ये (Budget 2024) इन्कम टॅक्स हा महत्त्वाचा घटक ठरू शकतो. देशात सर्वसामान्य जनतेची टक्केवारी अधिक असल्याने सरकार त्यांच्या डोक्यावरचा ओझं कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते. यावर्षी आपण इन्कम टॅक्स रिटर्नच्या बाबतीत एक अनोखा विक्रम करून दाखवला होता, असेसमेंट इयर 2023-24 मध्ये भारतात एकूण 8.18 कोटी लोकांनी आयटीआर (ITR) भरून सरकारला खुश केलं होतं, त्यामुळे आता सरकार देखील जनतेला खुश करेल का? हे पाहणं आकर्षक ठरणार आहे.