Business Books : तुम्हांलाही व्यवसाय सुरु करायचा आहे? प्रत्येक उद्योजकाने वाचावी अशी काही पुस्तकं..

Business Books: एखादी नवीन गोष्ट सुरुवात करताना त्याचा नीट अभ्यास करावा. त्यातले फायदे आणि तोटे कोणते, स्पर्धक कोण आहेत इत्यादी विषय सखोल तपासावेत. व्यवसाय सुरु करताना सुद्धा या गोष्टी डोळ्यांसमोर ठेऊन सगळी आखणी करावी. आज आम्ही तुम्हाला अशी काही पुस्तकं सुचवणार आहोत ज्यांचं वाचन करून तुम्ही व्यवसायची आखणी करू शकता. तुम्हाला व्यवसाय सुरु करण्याबद्दल यांमधून अधिक माहिती मिळेल, आजूबाजूची लोकं व्यवसाय कसा करतात, त्यांना सामोरे जावे लागणारे अडथळे कोणते या सर्व विषयांची माहिती यात सामावलेली आहे.

१) थिंक एंड ग्रो रिच (Think and Grow Rich)- नेपोलियन हिल (Napoleon Hill)

नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं हे पुस्तक वर्ष 1937 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालं. हे पुस्तक लिहितीना नेपोलियन यांनी तब्बल 20 वर्ष अभ्यास केला, अनेक यशस्वी उद्योगपतींची भेट घेतली ज्यांत हेन्द्री फोर्ड (Henry Ford), थोमास एडिसन(Thomas Edison), एलेकझेन्डर ग्राहम बेल(Alexander Graham Bell) इत्यादी थोर मोठ्यांचा समावेश आहे. हे पुस्तक तुम्हाला एक सकारात्मक विचार करायला मदत करेल. यामध्ये 13 सिद्धांत (Principles) दिले गेले आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही पैसा आणि यश दोन्ही मिळवू शकता. एखादा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, काहीतरी खास करवून दाखवण्याची इच्छाशक्ती यांचा पुस्तकात समावेश आहे (Business Books).

२) द मेजिक ऑफ थिंकीन्ग बिग (The Magic Of Thinking Big)- डेविड जे स्च्वार्त्झ (Business Books)

या पुस्तकात सकारात्मक विचारांची शक्ती किती मोठी असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ध्येय हे केव्हाही मोठं असावं आणि सकारात्मक विचार आणि पदोपदी घेतलेले कष्ट यांमुळे एक ना एक दिवस ते पूर्ण होईलच असा विश्वास लेखकाने यात व्यक्त केला आहे. आपलं ध्येय मोठं असेल तर ते तुम्हाला सातत्याने काम करण्याची शक्ती देईल, स्वतःवरचा विश्वास आणखीन वाढवण्यासाठी मदत करेल. या पुस्तकात काही अश्या गोष्टी नमूद केल्या आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही मनात असलेली भीती घालवून यश संपादन करू शकता.

३) द पावर ऑफ पोझिटीव थिंकिंग (The Power Of Positive Thinking)- नॉर्मन विन्संट पेले( Norman Vincent Peale)

लेखकाच्या मते व्यवसाय सुरु केल्यापासून पदोपदी व्यावसायिकाला संकटांना सामोरं जावं लागतं. या पुस्तकाचं वाचन (Business Books) करून तुम्ही स्वतःमधला विश्वास जागवू शकता, नकारात्मक उर्जा बाजूला सरत यशस्वी आयुष्याची सुरुवात करू शकता.

४) द फाऊनटनहेड (The Fountainhead)-आय्न ( Ayn Rand)

हे पुस्तक स्वतंत्र व्यक्तीच्या विचारांना प्रोत्साहन देते. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विचार करण्याची क्षमता असते. या पुस्तकाचा नायक होवार्ड हा व्यवसायाने आर्किटेक(Architect) आहे आणि समाजाकडून झालेल्या विरोधांना पत्करून कसा तो आपला व्यवसाय सुरु ठेवतो याची गोष्ट पुस्तकात सांगण्यात आली आहे. एखादा व्यवसाय कायम टिकवण्यासाठी स्वतःवर किती जास्त विश्वास असायला हवा हे या पुस्तकातून समोर येतं.

५) द फर्स्ट बिलिअन इज द हार्डेस्ट (The First Billion is The Hardest) – टी बॉन पिकेंस( T Boone Pickens)

या पुस्तकाचे लेखक स्वतः अमेरिकेतील एक यशस्वी उद्योजक आहेत. आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांनी कशी मेहनत घेतली याबदल ते पुस्तकात बोलतात. व्यवसाय चालवताना आलेले अनुभव, सोसावा लागलेला पराभव, मिळालेलं यश इत्यादी गोष्टींचा त्यांनी या पुस्तकात समावेश केला आहे