Business Idea : ‘हा’ व्यवसाय म्हणजे भविष्याची गरजच; दर महिना कमवाल लाखो रुपये

बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चलती आहे. पेट्रोल- डिझेल आणि CNG च्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहे. बाजारातील वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवायला सुरुवात केली आहे. चालवायला सोप्पी आणि खिशाला परवडणारी असल्याने सध्या देशातील शहरांपासून ते अगदी खेडेगावापर्यंत सर्वत्र रस्त्याने इलेक्ट्रिक गाड्या दिसत आहेत. अशावेळी भविष्यातील लोकांच्या गरज लक्षात घेऊन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचा बिसनेस (Business Idea) सुरु करणं नक्कीच बेस्ट ठरेल. हा व्यवसाय कसा सुरु करावा? त्यासाठी काय काय लागत? किती खर्च पडेल? आणि इतक्या सगळ्या प्रयत्नानंतर तुम्हाला फायदा किती होऊ शकतो हे आज आपण जाणून घेऊया ….

CNG, पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी ज्याप्रमाणे ठिकठिकाणी पेट्रोल पंप बसवण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारून तुम्ही चार्जिंगच्या बदल्यात पैसे कमवू शकता. यासाठी तुमच्याकडे रस्त्याच्या कडेला 50 ते 100 स्क्वेअर यार्डचा रिकामा प्लॉट असायला पाहिजे. या जागेत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तुम्हाला वनविभाग, अग्निशमन विभाग आणि संबंधित महानगरपालिकेकडून NOC घ्यावी लागेल. यासोबतच चार्जिंग स्टेशनवर अग्निशमन यंत्रणा, हवा, स्वच्छतागृह याचीही सोय तुम्हाला करावी लागेल.

कसा सुरु करावा व्यवसाय –

स्वतःचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी तुम्ही भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाकडे अर्ज करू शकता. किंवा कोणत्याही बड्या फ्रँचायझी घेऊनही तुम्ही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा बिझनेस सुरू करू शकता. देशात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत चार्जिंग स्टेशनची फ्रँचायझी द्यायला तयार आहेत.

खर्च किती होईल? (Business Idea)

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी (Business Idea) जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. ते सुद्धा तुम्ही कशाप्रकारे चार्जिंग स्टेशन सुरु करता यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला तुमचे स्वतःचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 3 लाख ते 30 लाख रुपये खर्च होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही या व्यवसायासाठी एखाद्या कंपनीची फ्रँचायझी घेण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये खर्च होईल.

फायदा किती मिळणार?

या व्यवसायामध्ये (Business Idea) तुम्हाला किती फायदा होईल हे तुम्ही वाहन मालकांकडून चार्जिंगसाठी किती पैसे घेणार यावर अवलंबून आहे.जर तुम्ही 3000 KW चे चार्जिंग स्टेशन बसवल्यास 2.5 रुपये प्रति किलोवॅट याप्रमाणे तुम्ही ग्राहकांकडून पैसे घेऊ शकता. या हिशोबाप्रमाणे तुम्ही दिवसाला 7 हजार रुपयांची म्हणजेच महिन्याला 2 लाखांची कमाई आरामात करू शकता. भविष्यात इलेक्ट्रिक गाडयांची मागणी आणखी वाढतच जाणार आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास या व्यवसायाला चांगला वाव आहे.