Business Idea : बागकामाची आवड करवून देईल लाखो रुपयांची कमाई; कशी ते जाणून घ्या

Business Idea : तुम्हाला बागकाम, फुल-झाडं यामध्ये काही खास रुची आहे का? हो तर ती जपून ठेवा कारण तुम्ही याच आवडीचा फायदा करून घेत भरगोस रक्कम कमवू शकता. आज कालच्या या जगात माणसाची आवड किंवा त्याच्याजवळ असलेली कला ही कुठल्याही घेतलेल्या पदवी एवढीच महत्त्वाची असते. भले तुमच्याजवळ पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण नसेल तरीही अंगी असलेली कला किंवा एखाद्या गोष्टी प्रती असलेली आवड तुम्हाला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी नक्कीच मदत करू शकते. बाग म्हटलं की आपल्या डोक्यात एकच व्यवसाय येतो तो म्हणजे माळ्याचा, घाबरून जाऊ नका!! आम्ही तुम्हाला जे पर्याय सुचवणार आहोत ते अत्यंत वेगळे आणि आजच्या जगाला अनुसरून असणार आहेत.

१) तुमच्या बागेबद्दल लेखन करा:

आज इंटरनेटच्या सहाय्याने गावात बसलेली एखादी व्यक्ती सुद्धा सात समुद्रा पार बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीशी चर्चा करू शकते. मग आपण देखील या तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे की नाही? तुम्हाला जर का लेखनाची आवड असेल तर नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या पोर्टल, वेबसाईट आणि कंपन्यांसाठी बाग कामाविषयी लेखन करू शकता. एखादा विषय धरून आपण त्याच्यावर दीर्घकाळ लेखन केलं की त्या विषयावरची आपली पकड ही चांगली बनते. किंवा तुम्ही अगदीच स्वतःची वेगळी वेबसाईट सुरू करून त्यावर दररोज किंवा आठवड्यातून एकदा बाग कामाविषयी, काही फुला फळांविषयी माहिती देणारं लेखन करू शकता.

२) फोटोग्राफर बना : Business Idea

तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे का? तुमचं उत्तर हो!! असं असेल तर बाकी लोकांप्रमाणे कुठल्याही लग्नसराईत किंवा जंगलात जाऊन फोटो काढण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या बागेतले फोटो काढून सुद्धा तुम्ही भरपूर कमाई करू शकता. फुल झाडांची आवड आणि फोटोग्राफीचे कौशल्य असे एकत्र आणून तुम्ही स्वतःचे वेगळे करियर बनवू शकता. वरती म्हटल्याप्रमाणे फोटोग्राफीच्या देखील अनेक वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यांचा त्वरित शोध घ्या. फेसबुक किंवा युट्युब यांसारख्या प्लेटफॉर्मवर अनेक माहितीपर विडिओ आजकाल गाजत आहेत त्यामुळे तुमच्याजवळ असलेली माहिती अशाच काही व्हिडिओज द्वारे तुम्ही जगाभरात पोहोचवू शकता. तुमच्या टिप्सचा अनेकांना फायदा होईल आणि ह्या कंटेंट मधून तुम्ही भरघोस कमाई करू शकता.

३) बागायतीच्या उत्पादनांची विक्री करा:

तुम्हाला बागेची आवड आहे म्हणजे नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फुल-झाडं तुमच्या बागेत आणून सुशोभित केलीच असतील. मग याचं प्रमाण आता वाढवा, छोट्या छोट्या रोपांची, त्यांच्या बियांची विक्री सुरू करा. जवळपास कुठे एखादा स्टॉल असेल किंवा सोसायटीमध्ये जाऊन अशा प्रकारच्या वस्तूंची विक्री केली जाऊ शकते. आज-काल अनेक लोकं घरगुती वस्तूंच्या शोधात असतात त्यामुळे अशा परिस्थितीचा फायदा करून घेऊन तुम्ही चांगली मिळकत करू शकता. हाच व्यवसाय (Business Idea) थोडा पुढे नेत यात लोणची आणि चटण्यांचा समावेश केला जाऊ शकतो. सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय आज बाकी अनेक व्यवसायांप्रमाणे मोठा पल्ला गाठत आहे त्यामुळे लोणची, जॅम किंवा घरगुती चटण्या बनवून चांगले उत्पन्न नक्कीच मिळवले जाऊ शकते (Business Idea). इंटरनेट हा कुठल्याही व्यवसायाच्या माध्यमातून आपला नेहमी सोबती बनून काम करत असतो, त्यामुळे तुमचा ग्राहक वर्ग वाढवण्यासाठी किंवा तुमच्या पदार्थांबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता तसेच ऑनलाइन डिलिव्हरी द्वारे लोकांपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं.