Business Idea । आज काल नोकरी करणे हे अत्यंत अवघड झाले आहे. त्यातच महिला असेल तर बऱ्याचदा महिलांना लग्न झाल्यावर नोकरी करू दिली जात नाही. त्या हाऊस वाईफ असल्यामुळे पैशांसाठी दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून असतात. परंतु आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळेस दुसऱ्याकडे पैसे मागणे योग्य नसून तुम्ही घरी बसल्या एक स्वतःचा बिजनेस स्टार्ट करू शकतात. जेणेकरून तुम्हाला लागणारा पैसा तुम्ही स्वतः कमावू शकाल आणि स्वावलंबी व्हाल. यासाठी आम्ही तुम्हाला आज काही बिझनेस आयडिया सांगणार आहोत. या बिझनेस आयडिया मधून तुम्ही कमी खर्चात जास्त पैसे कमावू शकतात.
आज तुम्हाला सांगण्यात येणाऱ्या बिझनेस आयडिया (Business Idea) मध्ये तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची नसून तुम्ही स्वयंपाक करून तुमचा बिजनेस वाढवू शकतात. जर तुम्ही हाऊस वाईफ असाल आणि तुमच्या हाताला चांगली चव असेल तर तुम्ही काही वस्तू घरी बनवून त्या मार्केटमध्ये विकू शकतात. आणि तुमचा छोटासा बिजनेस सुरू करू शकतात. चला तर मग उशीर कशाला करताय? या सर्व व्यवसायांबद्दल जाणून घेऊयात
१) लोणचं बनवणे-
लोणचं खाणे तुम्हाला नक्कीच आवडत असेल. लोणचं बनवणे हे प्रत्येकाला जमत नसलं तरी प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे लोणचं आहे. त्यानुसार तुम्ही लोणचं बनवण्याचं काम सुरू करू शकतात. बऱ्याच विभागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोणचं बनवलं जातं. खानदेशात, विदर्भात, आणि पश्चिम महाराष्ट्रात या तिन्ही ठिकाणी लोणचं बनवण्याच्या पद्धती आणि टेस्ट देखील वेगवेगळे आहेत. त्यानुसार तुम्ही ज्या भागातील असाल त्या भागात तयार करण्यात येणारे लोणचं बनवून तुमच्या जवळच्या किराणा दुकानावर सॅम्पल म्हणून ठेवू शकतात. आणि त्यानंतर तुम्ही डिलिव्हर देखील करू शकतात. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लोणचं विक्री करू शकतात.
२) टिफिन सर्विस- (Business Idea)
शहरांमध्ये शिक्षणासाठी बरेच विद्यार्थी आपलं घर सोडून येतात. शिक्षण नोकरी यासाठी आलेल्या या मुली मुलांना घरच्या जेवणाची चव हवी असते. अशावेळी तुम्ही टिफिन सर्विस सुरू करून या बाहेर गावच्या मुली मुलांना टिफिन बनवून देऊ शकतात. बऱ्याचदा हे मुले मुलं हॉटेल्स मध्ये जाऊन जेवण करतात. परंतु त्यांना हवी तशी टेस्ट न मिळाल्यामुळे त्यांची भूकमार होते. आणि हॉटेलमध्ये जेवण करणे हे प्रत्येक वेळेस आर्थिक दृष्ट्या शक्य नसते. अशावेळी तुम्ही जर घरगुती टिफिन सर्विस सुरू केली तर अशा मुलांना घरगुती जेवण देखील मिळू शकते. आजकाल प्रत्येक कॉलनीमध्ये एक किंवा दोन घरगुती मेस उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला देखील टिफिन सर्विस सुरू करायची असेल तर तुम्हाला बेस्ट टेस्ट देणे गरजेचे आहे. तुमच्या टेस्टमुळे टिफिन सर्विसेस चा बिझनेस वाढू शकतो. आणि तुम्हाला यातून बंपर कमाई होऊ शकते.
३) पॅन्ट्री किंवा कॅन्टीनसाठी जेवण बनवणे-
महिलांच्या हाताला वेगळी चव असते असं म्हणतात. त्यामुळे पॅन्ट्री आणि कॅन्टीनमध्ये देखील जेवण बनवणाऱ्या महिलांची मोठ्या प्रमाणात गरज असते. त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट असू शकत. त्यासाठी तुम्हाला ठराविक लोकांच्या जेवणाची ऑर्डर घ्यावी लागेल. त्यानुसार तुम्हाला जेवण बनवून कॅन्टीन किंवा पॅन्ट्री मध्ये पाठवावे लागेल. त्यासोबतच तुम्ही ऑफिसच्या बाहेर जेवण करणाऱ्या व्यक्तींच्या देखील ऑर्डर घेऊ शकतात. या बिझनेस मधून (Business Idea) तुमचा चांगला फायदा होऊ शकतो आणि पैसे देखील मिळू शकतात.