Business Idea : एकदाच करा गुंतवणूक अन आयुष्यभर कमवा पैसे; कधीही बंद न पडणारा हा व्यवसाय तुम्हीही करू शकता

बिझनेसनामा ऑनलाईन । चांगली आणि आलिशान लाइफ जगायची असेल तर सर्वात चांगलं आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे बिजनेस (Business Idea) . आजकाल नोकरी करण्यापेक्षा बिझनेस स्टार्टअपमध्ये लक आजमावण्याचा विचार प्रत्येक जण करत आहे. जेणेकरून स्वतःचा छोटासा बिझनेस उभा राहील आणि लक्झरी लाईफ जगता येईल. परंतु त्यासाठी बऱ्याच जणांना बिझनेस नेमका कोणता करावा हा प्रश्न पडतो. बिझनेस सुरू करण्यासाठी त्या बिझनेसची निवड करणे, तो टिकेल का असे प्रश्न बऱ्याच व्यक्तींच्या मनात येतात. यासोबतच त्या बिझनेस मध्ये गुंतवणूक केल्यास आयुष्यभर आपल्याला पैसे देईल असाच व्यवसाय निवडणे महत्त्वाचे ठरू शकते. त्यानुसारच कोणता बिजनेस करायचा हे ठरवले जाते. अशाच काही बिजनेस बद्दल तुम्हाला आम्ही काही खास आयडिया देणार आहोत.

गॅस एजन्सी- (Business Idea)

घरगुती उपयोगासाठी गॅस अतिशय जीवनावश्यक वस्तू आहे. त्यामुळे गॅस एजन्सीचा व्यवसाय (Business Idea) हा अत्यंत फायदेशीर आहे. या व्यवसायासाठी बरेच आवश्यक नियम आणि अटी आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल परंतु पैशांची समस्या उद्भवत असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला यासाठी कर्ज देखील दिले जाते. गॅस एजन्सीचा व्यवसाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एजन्सी कडून डिस्ट्रीब्यूटर शिप घेणे गरजेचे आहे. या डिस्ट्रीब्यूटर शिप मध्ये शहरी, ग्रामीण, ग्रामीण आणि हार्ड टू रीच क्षेत्रीय वितरक असे चार प्रकार दिले जातात. त्यानुसार तुम्ही गॅस एजन्सी कोणत्या ठिकाणी स्थापन करायची हे ठरवू शकता. त्या आधारावर तुम्हाला एजन्सीचा परवाना मिळू शकतो. परंतु त्यासाठी महत्त्वाच्या अटी पाळाव्या लागतील.

भारत गॅस, इंडियन गॅस, आणि एचपी गॅस या तिन्ही सरकारी कंपन्या आहे. त्यांच्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूटर शिप चे वितरण करण्यात येते. जेव्हा या कंपन्यांना डिस्ट्रीब्यूटर शिप चे वितरण करायचे असते तेव्हा ते वृत्तपत्र आणि इतर माध्यमातून जाहिराती देतात. या जाहिरातींच्या माध्यमातूनच तुम्ही अर्ज दाखल करू शकतात.

काय आहे प्रक्रिया –

जर तुम्हाला गॅस एजन्सीसाठी परवाना हवा असेल तर तुम्ही http://www.lpgvitrakchyan.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात. यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल. त्यानंतर कंपनीच्या माध्यमातून अर्जदाराची मुलाखत घेतली जाईल. अर्जदार ही मुलाखत उत्तीर्ण झाल्यास त्याने दिलेली संपूर्ण माहिती व्हेरिफाय कलेची जाते. सर्व माहिती व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला एक पत्र देण्यात येईल. आणि या प्रक्रियेनंतर तुम्हाला ज्या कंपनीची डिस्ट्रीब्यूटरशिप घ्यायची आहे त्या कंपनीमध्ये सिक्युरिटी म्हणून काही रक्कम जमा करावी लागेल.

गॅस एजन्सी घेण्यासाठी महत्त्वाच्या काही अटी

1) तुम्हाला गॅस एजन्सीचा बिझनेस (Business Idea) सुरू करायचा असेल तर तुमचे वय 21 ते ६० वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.
2) जो व्यक्ती हा व्यवसाय करू इच्छित आहे तो व्यक्ती कमीत कमी दहावी उत्तीर्ण तरी असणे गरजेचे आहे.
3) जर कुटुंबातील एखादा व्यक्ती तेल विपणन कंपनीचा कर्मचारी असेल तर तुम्ही गॅस एजन्सी हा बिजनेस करू शकत नाही.
4) हा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला १० हजार रुपये भरावे लागतील आणि गोदाम, एजन्सी चे ऑफिस बांधण्याकरता पंधरा लाख रुपयांचे भांडवल तुमच्याकडे असले पाहिजे.