बिझनेसनामा ऑनलाईन । तुम्ही जर का स्वतःचा व्यवसाय सुरु करू पाहत असत तर आम्ही आज तुम्हाला एक नवीन कल्पना सुचवणार आहोत. या व्यवसायातून भरपूर कमाई होईलच पण सोबतच काम करण्याचे समाधानही मिळेल. हा व्यवसाय सुरु करताना तुम्हाला जास्ती पैसे गुंतवण्याची गरज नाही. म्हणजेच काय तर कमीत कमी पैश्यात तुम्ही खूप मोठा व्यवसाय सुरु करू शकता. आम्ही बोलत आहोत जेनारिक आधार (Business Idea) बद्दल. या कंपनीत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमका काय व्यवसाय आहे? आणि कसा फायदेशीर ठरेल.
काय आहे जेनेरिक आधार (Business Idea)?
जेनेरिक आधार हा एक फार्मसी बिजनेस आहे. हा बिजनेस Online आणि Offline करता येतो. आपल्या उत्तम दर्ज्याच्या प्रोडक्ट्ससाठी हि कंपनी ओळखली जाते. भारत सरकारच्या आधार योजने अंतर्गत लोकांना कमी किमतीत अधिकाधिक चांगल्या दर्ज्याची औषधं देण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जातो. खास करून Franchise Business असेल तर इथे भरपूर पैसे कमावता येतात. अर्जुन देशपांडे या युवा व्यावसायिकाने सुरु केलेली हि कंपनी आहे, जिची सुरुवात पुण्यात झाली होती. मात्र आता हि कंपनी देशातील 18 विविध राज्यांमध्ये व्यवसाय करते, या राज्यांच्या 130 पेक्षाही अधिक शहरांमध्ये हि कंपनी कार्यरत आहे.
रतन टाटा यांची कंपनीमध्ये गुंतवणूक:
देशातील नावाजलेल्या उद्योगपतींपैकी एक म्हणजे रतन टाटा. जेनेरिक आधार सोबत काम करण्याचा हा एक सर्वात मोठा फायदा म्हटला पाहिजे. या कंपनीमध्ये रुजू झालेल्या दुकानदारांना कंपनीकडून 40 टक्के मार्जिन दिलं जातं, तसंच ग्राहकांना औषधांवर 80 टक्क्यांपर्यंत सुट दिली जाते. जे आधीपासूनच फार्मसी चालवतात, किंवा ज्यांना या क्षेत्रातील अनुभव आहे केवळ अश्या लोकांसोबतच कंपनी काम करते.
हा व्यवसाय (Business Idea) सुरु करताना सुरुवातीला 1.5 लाख ते 2.5 लाख पर्यंतची गुंतवणूक आवश्यक आहे. सोबत फार्मसी सुरु करण्यासाठी लागणारी जागा व इतर महत्वाच्या गोष्टी आपल्या जवळ असणं अपेक्षित आहे. इथे पुढे कदाचित ट्रेनिंग आणि मार्केटिंगचा खर्च येऊ शकतो.
जेनेरिक आधारचे दुकान कसे सुरु कराल?
जेनेरिक अधारची फार्मसी सुरु करायची असल्यास तुमच्याकडे या क्षेत्रातील अनुभव असला पाहिजे. योग्य ज्ञान असेल तरच तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. व्यवसाय सुरु करताना तुमच्याजवळ ड्रग लायसन्स असणे सगळ्यात महत्वाचे आहे. जर का तुम्ही या कंपनीची franchise सुरु करणार असाल तर आधी कंपनी तुम्हाला जेनेरिक आधारचा ब्रेंड लोगो( Brand Logo) देईल, या नंतर ब्रेन्डिंग मटेरियल( Branding Material), इन हाउस प्रोडक्ट( In House Products) आणि औषधं विकत घेण्यासाठी सॉफ्टवेर दिला जाईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही genericadhar.com या कंपनीच्या अधिकृत साईटवर जाऊ शकता. इथे एक ओनलाईन फॉर्म दिला जाईल, जिथे नाव, मोबाईल नंबर, इमेल आयडी आणि इतर विचारलेली माहिती देऊन तुम्ही अर्ज पूर्ण करण अपेक्षित आहे. तुमचा अनुभव आणि कामाची पोझिशन यानुसार 2 ते 6 लाख पर्यंत रुपये प्रत्येक वर्षाला कमावले जाऊ शकतात.