Business Idea : नोकरीची चिंता सोडा; ‘हा’ बिझनेस तुम्हाला बनवेल लखपती

बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या महागाईच्या या दुनियेत नोकरीसोबत दुसरा पण कोणता तरी जोडधंदा असावा असं प्रत्त्येकालाच वाटत. कमी खर्चात जास्त फायदा कसा मिळेल हे डोक्यात ठेऊन आपण त्यानुसार कोणता जोडधंदा करायचा हे ठरवत असतो. तुम्ही जर नोकरी करत करत शेतीच्या माध्यमातून काही कमाई करायच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका पिकाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सुरुवातीला एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कायमच नफा मिळवता येईल. गुलखैरा असं या आयुर्वेदी वनस्पतीचे नाव असून या फुलाच्या माध्यमातून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता.

गुलखेरा वनस्पतींमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. अत्यामुळे या वनस्पतीला मोठी मागणी आहे. यापूर्वी गुलखेरा वनस्पतीची शेती प्रामुख्याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये केली जात होती परंतु आता भारतात सुद्धा या शेतीकडे लोकांचे आकर्षण वाढलं आहे. गुलखेराच्या रोपाला बाजारात नेहमीच मागणी असते. गुलखैरा झाडाची मुळे, देठ, पाने आणि बिया काही बाजारात सहज विकल्या जातात.

गुलखैरा शेती करण्यासाठी जास्त खर्च करावा लागत नाही त्यामुळे हि शेती करण्यासाठी तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तसेच अजून एक चांगली गोष्ट म्हणजे एकदा बी घेतल्यानंतर तुम्हाला बियाणांवर पुन्हा पुन्हा पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कारण आपण प्रथमच विकत घेतलेल्या बियाण्यांपासून तयार केलेल्या वनस्पतीच्या बिया पुन्हा पेरल्या जाऊ शकतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक क्विंटल गुलखैरा 10,000 रुपये प्रति क्विंटल दराने सहज विकले जाते. एका बिघा शेतीत ५ क्विंटल गुलखैराचे उत्पादन घेतले तर तुम्ही 50 ते 60 हजार रुपये सहज कमवू शकता. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात गुलखैराची लागवड केली तर अशा परिस्थितीत तुमची लाखोंमध्येही पैसे कमवू शकता. गुलखैराचा उपयोग पुरुषांची ताकद वाढवणाऱ्या औषधांमध्ये केला जातो. याशिवाय खोकला, ताप आणि इतर तत्सम आजारांवर औषधांमध्ये गुलखेऱ्याच्या फुलांचा वापर केला जातो.