Business Idea : दिवाळी आणि नवरात्रीत ‘हे’ 5 व्यवसाय करून मिळवा बक्कळ पैसा

बिझनेसनामा ऑनलाईन । दिवाळी आता केवळ एक महिना दूर आहे, भारतात दिवाळीची मजा वेगळीच असते. संपूर्ण देश दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतो. परंतु आनंद आणि उत्साह जगवणाऱ्या दिवाळीच्या या काळात तुम्ही लाखो रुपयांची कमाई सुद्धा करू शकता हे माहिती आहे का? आपल्या देशात सण आणि उत्सव म्हटलं कि कोणीही खर्च करायला मागे पुढे बघत नाही. महत्वाचं म्हणजे दिवाळीच्या काही दिवस आधी नवरात्र सुद्धा येणार आहे, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही Business Idea सांगणार आहोत ज्या नक्कीच तुम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करतील. तर हे व्यवसाय नेमके कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया.

१) सजावटीचे सामान ( Decoration Material)-

सण म्हटला कि घर सजवणं आलंच. सण आला कि आपण घर झाडतो, पुसतो आणि सजवतो. सजावटी शिवाय कोणताही सण पूर्णच होत नाही. त्यामुळे सजावटीच्या सामानाचा व्यवसाय (Business Idea) जर का तुम्ही सुरु केलात तर नक्कीच यातून मोठी कमाई केली जाऊ शकते. सजावटीमध्ये तुम्ही प्लास्टिकची फुलं, रांगोळीचं समान इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकता.

२) मातीचे दिवे (Mud Lamps)-

दिवाळी ही दिव्यांशिवाय अपुरी आहे. त्यामुळे जर का तुम्ही दिव्यांचा व्यवसाय सुरु केलात तर त्यातून चिक्कार पैसे कमावता येऊ शकतो. हे दिवे तुम्ही घरी बनवू शकता किंवा एखाद्या कारागिराकडून विकत घेऊ शकता. दिवाळीच्या दिवसांत दिव्यांची मागणी पाहत या व्यवसायाचा विचार करायलाच हवा .

३) पूजेचं साहित्य (Pooja Material)- Business Idea

नवरात्रात नऊ दिवस देवीची पूजा व उपासना केली जाते, तसेच दिवाळीत कृष्णाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात पूजेला फारच महत्व आहे. त्यामुळे हिंदू सणांच्या वेळी तुम्ही अश्या व्यवसायच विचार नक्कीच करावा. पूजेच्या सामानात फुलं-फळांचा, हळदी कुंकवाचा, अगरबत्ती दिव्यांचा समावेश असतो. आणि कामाच्या गडबडीत हे एक एक सामान जमवत बसणं काही शक्य होत नाही. त्यामुळे हा व्यवसाय (Business Ideas) जर का तुम्ही सुरु केलात तर नक्कीच यातून भरपूर फायदा होईल.

४) मूर्ती आणि मेणबत्त्या (Idols and Candles)-

दिवाळीच्या काळात कृष्णाची पूजा, लक्ष्मी पूजना दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. समोर मूर्ती असली कि मन एकाग्र व्हायला मदत होते तसेच आपण ज्याची भक्ती करत आहोत तो आपल्या समोर उभा आहे असा भाव निर्माण होतो. मूर्ती हि अनेकांच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यामुळे हा व्यवसाय सुद्धा जोमाने चालू शकतो. तसेच मेणबत्त्या सजावटीसाठी किंवा दिव्यांसोबत वापरल्या जाऊ शकतात. आजकाल बाजारात रंगीत मेणबत्या उपलब्ध आहेत त्यामुळे याचा विचार करावा.

५) लाईटच्या माळा( Electric Lights)-

दिवाळी हा दिव्यांचा आणि रोषणाईचा सण आहे. काळोखावर पूर्णपणे मात करत दिव्यांनी घर उजळून टाकावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आजकाल या दिव्यांची मागणी वाढत चालली आहे. लाईटच्या माळा या एकाच्या रंगाच्या किंवा अनेक रंगांच्या असू शकतात. मात्र लोकांची आवड पाहता हा नक्कीच फायदा करवून देणारा व्यवसाय आहे.