बिझनेसनामा ऑनलाईन । वाढत्या महागाईमुळे नोकरी करणं हे काही सर्वानाच परवडत नाही, त्यामुळे अनेकजण स्वतःचा असा नवीन व्यवसाय (Business Idea) सुरु करण्याचा विचार करतात. परंतु नेमका कोणता व्यवसाय करावा, त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागले आणि महत्वाचे म्हणजे यातून आपल्याला फायदा किती होईल याचा विचार आपण करत असतो. तुम्हीही नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला कधीही न संपणारा आणि आपल्या सर्वांच्या जीवनासाठी गरजेचा असणाऱ्या पाण्याच्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.
पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे. एखादवेळी उपाशी राहिलेलं सोपं, पण तहानलेल्या अवस्थेत जगणं काठीण आहे. पाण्याबाद्ल काय वेगळं सांगायची गरज नाही. दररोजच्या जीवनामध्ये अनेक कारणांसाठी आपण पाण्याचा उपयोग करत असतो. जगात वाढणारं प्रदूषण पाहता पिण्याचं पाणी कित्ती सुरक्षित असेल ही खात्री देता येत नाही. तुम्ही जर का गावात राहत असाल तर विहीर, झर्यांची मुब्काल सोय असते, मात्र शहरात परिस्थिती वेगळी असल्याने जर का तुम्ही स्वच्छ पाण्याची सोय करू शकत असाल तर हा व्यवसाय (Business Idea) नक्कीच चालेल. भारतात आज पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय 20% च्या दराने दरवर्षी वाढत आहे. 1 ltr. पाण्याच्या Bottles चा बाजारात 75% हिस्सा आहे. त्यामुळे तुम्ही देखील इथे आकर्षक कमाई करू शकता. बाजारात अनेक RO च्या Mineral Water Bottles उपलब्ध आहेत. अनेक मोठ मोठ्या कंपन्याकडून त्या तयार केल्या जातात.
मिनरल वॉटर बिझनेस सुरु करताना हे लक्षात ठेवा
मिनरल वॉटर बिझनेस (Business Idea) हा व्यवसाय सुरु करताना आपली Company Register करावी. Company साठी Pan Number व GST Number तयार करावा. या नंतर Raw Materials ची खरेदी करावी ज्यात Boring machine, RO machine व Chiller Machine चा समावेश होतो. यासाठी किमान 1000 ते 1500 वर्गफूट जागा आवश्यक आहे, जिथे तुम्ही Storage Tank बसवू शकता. Water Plant ची सुरुवात अश्या ठिकाणी करावी जिथे TDS level जास्ती असत नाही. या नंतर तुम्हाला सरकारकडून License आणि ISI number मिळवावा लागेल. नंतर तुम्हाला कमीत कमी 100 Water Jar विकत घ्यावे लागतील ज्यासाठी किमान खर्च 4 ते 5 लाख रुपये असेल. जर का तुमच्या व्यवसायातून 1000ltr. पर्यंत पाण्याची विक्री होत असेल तर 50,000 रुपये नक्कीच कमावले जाऊ शकतात.
पाण्याच्या व्यावसायातून कित्ती फायदा होऊ शकतो? (Business Idea)
बाजारात पाणी हा एक असा घटक आहे ज्याची मागणी कधीच कमी होणार नाही. त्यामुळे हा व्यवसाय कधीच पूर्णपणे बंद होणार नाही. मात्र Water Supply मध्ये काही अडचण आल्यास व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. तसेच Water Container मध्ये बिघाड झाल्यास व्यवसाय विस्कटू शकतो. या व्यवसायातून सुरुवातीला 1 लाख पर्यंतची कमाई नक्कीच केली जाऊ शकते. जर का तुम्ही खरोखर एखादा व्यवसाय सुरु करू पाहत असाल तर हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.