बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढलं असून अनेकांचा कल हा व्यवसायाकडे (Business Idea) वळत आहे. बाहेर शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या घराच्या आसपास राहूनच नोकरीत जितका पगार मिळतो त्याच प्रमाणे व्यवसायाच्या माध्यमांतून कमाई करावी असं अनेकांना वाटत. परंतु व्यवसाय करायचं म्हंटल तर त्यासाठी आर्थिक भांडवल असावं लागलं. पैशाची गुंतवणूक केल्याशिवाय व्यवसाय सुरु होऊच शकत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमजोर असलेले अनेकजण व्यवसाय करू शकत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्हाला फक्त १० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
कोणता आहे बिझनेस ? (Business Idea)
आजकाल बाजारामध्ये मोबाईल ॲक्सेसरीज ला भरपूर डिमांड आहे. चार्जर ब्लूटूथ इयरफोन, फॅन लाईट, अनेक केबल, लाइटिंग स्पीकर, मोबाईल स्टॅन्ड, कार्ड रीडर, साऊंड बार स्पीकर यासारखे अनेक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार जर तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीजचा बिझनेस (Business Idea) केला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. हे मोबाईल ॲक्सेसरीज विकण्यासाठी दोन पद्धती आहे. एक म्हणजे तुम्ही या ॲक्सेसरीजचे चौकात एक छोटेसे दुकान टाकून विकू शकतात. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही दुकान खोलू इच्छित नसाल तर सप्लायर म्हणून देखील तुम्ही काम करू शकतात. म्हणजेच कमी खर्चात तुमचा मोबाईल ॲक्सेसरीज चा कारभार सुरू होऊ शकतो.
त्याचबरोबर आता बऱ्याच कंपन्या स्मार्टफोनसोबत हेडफोन देत नाही. हेडफोन आणि बाकीच्या ॲक्सेसरीज लोक बाजारातूनच विकत घेतात. तर तुम्ही देखील सुरुवातीला मोबाईल चार्जर इयरफोन मोबाईल स्टॅन्ड असं सामान विकू शकतात. हा बिजनेस पार्ट टाइम किंवा फुल टाइम मध्ये सुद्धा करू शकतो. या बिझनेस मध्ये बऱ्यापैकी कमाई होऊ शकते.
ह्या ॲक्सेसरीज आणायच्या कुठून तर त्यासाठी दिल्ली गफ्फार मार्केट मध्ये मोबाईल ॲक्सेसरीजचा हब आहे. त्या ठिकाणावरून जर आपण ॲक्सेसरीज विकत घेतले तर 12 ते 15 रुपयामध्ये आपल्याला डेटा केबल आणि बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. आणि त्याच ॲक्सेसरीज आपण इथे मिळवल्यात तर त्या 50 रुपयाला आपल्याला मिळतात. म्हणजेच विकणाऱ्या चा चांगलाच नफा होतो. सुरुवातीला तुम्ही हा बिझनेस करत असताना नफा न बघता कमी खर्चात या ॲक्सेसरीज विका किंवा या ॲक्सेसरीचा सप्लाय करा. हळू हळू तुमच्या व्यवसायात नक्कीच वाढ होईल. मुख्य म्हणजे अवघ्या १० हजारांच्या गुंतवणुकीसाठी हा सर्वात बेस्ट बिझनेस आहे.