Business Idea : मातीच्या ‘या’ व्यवसायातून होईल लाखो रुपयांची कमाई

बिझनेसनामा ऑनलाईन । जर का तुम्ही नवीन व्यवसाय( Business Idea) सुरु करू पाहत असाल तर आज आम्ही एक नवीन कल्पना घेऊन आलो आहोत. आपला व्यवसाय सुरु करायचा म्हटलं की तो अनोखा व भरपूर फायदा करवून देणाराच असायला हवा. लोकं नाविन्याच्या मागे जातात, त्यामुळे नवनवीन गोष्टी बाजारात आणणारे व्यवसाय जोमाने वाढतात. याप्रमाणे आपला व्यवसाय सुद्धा नवीन असावा. बाजारातली मागणी काय आहे हे ओळखून व्यावसायाची सुरुवात केल्यास भरपूर फायदा होऊ शकतो.

इतरांपेक्षा जर का तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही मुलतानी मातीचा व्यवसाय( Multani Mitti Business) सुरु करावा. मुलतानी मातीचे अनेक फायदे आहेत, विशेष करून सौदर्यात भर घाल्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. आणि दिवसेंदिवस मुलतानी मातीची मागणी बाजारात वाढत आहे. दुसरं म्हणजे कमीत कमी पैसे वापरून तुम्ही जास्तीत जास्त फायदा या व्यवसायातून मिळवू शकता.

मुलतानी मातीचा व्यवसाय कसा सुरु कराल? (Business Idea)

व्यावासायाच्या सुरुवातीला मुबलक प्रमाणात मुलतानी माती आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी बाजारातून मुलतानी माती विकत घ्यावी. एक किलोची गोणी तुम्हाला 20 ते 25 रुपयांत सहज मिळून जाईल. एकदा माती विकत घेतल्यानंतर तुम्ही Powder, Soap, Face Wash इत्यादी प्रकार बनवू शकता.

या व्यवसायात कित्ती खर्च येईल?

कुठलाही व्यवसाय ( Business Idea) सुरु करताना आधी छोट्या प्रमाणात करावा. त्यातून कितपत फायदा होतोय याचा अंदाज घेऊन तो पुढे वाढवला जाऊ शकतो. मुलतानी मातीचा व्यवसाय सुरु करताना सुरुवातीला साधारण खर्च 20 ते 30 हजार रुपये येईल, अनेकवेळा मुलतानी मातीपासून तुम्ही नेमका कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरु करू इच्छिता यावर अवलंबून असतो. यानंतर व्यवसायाला गरजेची असणारे मशीन विकत घ्यावी लागतात.

मुलतानी मातीचा व्यवसाय करताना ‘या’ गोष्टी महत्वाच्या आहेत

तुम्हाला सगळ्यात आधी मुबलक प्रमाणात मुलतानी मातीची गरज आहे. त्यानंतर पाणी व व्यवसायानुसार मशिन्स महत्वाचे आहेत. या मशिन्स मध्ये Filtering Machine, Packing Machine इत्यादींचा समावेश असतो . या सर्व मशिन्सचा वापर करून तुम्ही विविध products तयार करू शकता.

या व्यवसायातून किती पैसे कमवाल?

विचार करा की एक मुलतानी मातीच्या पाउडरची विक्री 12 किंवा 20 रुपयांमध्ये केली तरही महिन्याला तुम्ही हजारो रुपयांची कमाई करू शकता. दिसायला साधारण वाटणारा हा व्यवसाय तुम्हाला अवघ्या काही दिवसांतच लाखो रुपये कमवून देऊ शकतो, त्यामुळे खरोखरच कमीत कमी खर्चात व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर नक्कीच हा व्यवसाय सुरु करून बघावा.