Business Idea: माणसांची गरज ओळखून व्यवसाय सुरु करा; घरी बसल्या कमवाल लाखो रुपये

Business Idea: व्यस्त जीवनाच्या धामधमीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न कोणाचं नसणार? त्यातून चांगली कमाई होणार असेल तर मग तर विचारच करायची गरज नाही! पण मोठी गुंतवणूक किंवा खूप वेळ नसल्यामुळे अनेकदा आपण थांबतो. तुम्ही देखील असाच विचार करत आहेत का? तर आत्ताच हा विचार सोडून द्या कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक सोयीस्कर आणि कमी गुंतवणुकीच्या व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत, ज्यामुळे घरात बसून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

सुरु करा कार धुण्याचा व्यवसाय: (Business Idea)

रस्त्याच्या कडेला दिसणारा हा छोटासा व्यवसाय वाटतोय? पण प्रत्यक्षात तो तसा नाही. आताच्या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच स्वच्छ आणि चकचकीत गाडी ठेवायची असते. पण वेळेअभावी किंवा स्वतः गाडी धुण्याच्या झंझटीमुळे ते शक्य होत नाही. इथेच येते तुमच्यासाठी चालून आलेली ही चमकदार संधी. तुम्ही तुमच्या परिसरात किंवा घराजवळ कार धुण्याचं केंद्र सुरू करू शकता.यासाठी फक्त 25,000 इतकी गुंतवणूक करावी लागते त्यात पाणी, साबण, धुण्याची झडपं, आणि गाडी स्वच्छ करण्याची काही साधने यांचा समावेश होतो. थोडी मेहनत आणि चांगली सेवा दिली तर तुम्ही दरमहा 50,000 पर्यंत सहज कमावू शकता.

आता गाडी धुण्यासाठी खास यंत्रं उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 12,000 ते 1 लाख पर्यंत असली तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. सुरुवात छोटी करा, काही ठराविक गाड्यांच्या आकाराप्रमाणे 14,000 मध्ये तुम्हाला 2 हॉर्सपॉवरचं छान यंत्र मिळेल. हे यंत्र तुमची गाडी झटपट चकाचक करेल. विशेष म्हणजे यात पाईप आणि नोजल सुद्धा आहेत, म्हणजे वेगळा खर्च करावा नाही(Business Idea). पुढे तुमचा गाडी धुण्याचा धंदा चांगला जमला की तुम्ही मोठं यंत्र घेऊ शकता.