बिझनेसनामा ऑनलाईन । रोजच्या कामाला कंटाळलाय आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा होत आहे का? पण नेमका प्रश्न कोणता व्यवसाय सुरु कराव हा असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. आज आम्ही अजून एक सुपर आयडिया घेऊन आलो आहोत, या आयडियाचा वापर करून तुम्ही भरपूर पैसा तर नक्कीच कामवाल पण सोबतच काम करण्याचं समाधानही मिळेल. आजकाल अनेकजण स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यावर भर देतात त्यामुळे एकाच गोष्ट अनेक दुकानांमध्ये उपलब्ध होते, परीणामार्थी ग्राहक वर्ग विखुरला जातो. त्यामुळे तुम्हाला जर का ग्राहकांना टिकवायचं असेल तर व्यवसायाची कल्पना (Business Idea) हि वेगळी आणि झक्कास असायलाच हवी. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्याला कधीही मरण नाही. हा व्यवसाय म्हणजे जेवण बनवण्याचा व्यवसाय.
सण आणि समारंभांवर खर्च करण्यासाठी आज कोणीच मागे पुढे बघत नाही. काही वर्षांआधी केवळ लग्न किंवा मुजींचाच मोठा समारंभ व्हायचा पण आता जाग बदलेलं आहे, कोणाचा वाढदिवस असुद्या किंवा परीक्षेत अव्वल गुण मिळवल्यामुळे ठेवलेली सक्सेस पार्टी असुद्या तिथे जेवणाची व्यवस्था हि असतेच. आपल्याकडे आलेले पाहुणे पोटभर आणि मनसोक्त जेऊन गेलेत हि भावनाच आपल्याला पुरेशी असते. या गोष्टीचा सखोल अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कि केटरिंगच्या व्यवसाय खूपच जोरात चालू शकतो. तुम्हाला जर का रुचकर जेवण बनवण्याची, लोकांना पोटभर अन्न वाढण्याची आवड असेल तर हा व्यवसाय नक्कीच करावा.
केटरिंगच्या व्यवसायात या गोष्टी महत्वाच्या: Business Idea
एखादा व्यवसाय म्हटलं कि पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूक. सुरुवात हि कमीत कमी लोकांसह आणि कमीत कमी समूहासाठी असावी. तुम्ही एखाद्या घरगुती समारंभासाठी जेवण करू शकता किंवा लहानमुलांच्या सहलीपासून या व्यवसायाची सुरुवात केली जाऊ शकते. हळू हळू बाजाराचा अंदाज घेत व्यवसाय व हाताखाली लागणारी माणसं वाढवता येतील.
सुरुवातीला तुमच्याजवळ स्वयंपाकासाठी पुरेश्या गोष्टी असाव्यात ज्यात भांडी, किराणा माल, मसाले इत्यादींचा समावेश होतो. हा व्यवसाय सुरुवात करताना सुमारे 10,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल पण होणारा फायदा सुद्धा 25,000 ते 50,000 हजारांच्या घरात नक्कीच असेल तुम्ही घेतलेली मेहनत भरपूर असेल तर येणाऱ्या काळात एक लाख प्रती महिना देखील या व्यवसायातून कमावणं कठीण नाही.
व्यवसाय सुरु करण्यासाठी हाच काळ योग्य:
काही दिवसांतच आजूबाजूला लग्नांचा माहोल सुरु होईल, त्यामुळे व्यवसाय सुरु करण्याची हीच वेळ योग्य आहे. आजकाल लोकं Online जगात वावरतात, त्यामुळे सोशल मिडियाचा वापर करून आपल्या व्यवसायाचा प्रचार करावा. शेवटी हा व्यवसाय सुरु करताना एक गोष्ट कधीही विसरू नका कि जेवणात वापरली जाणारी भांडी, कडधन्या, भाजीपाला किंवा पाणी हे स्वछ असणं फारच गरजेचं आहे. तुम्ही अगदी मन लावून केटरिंगचा हा व्यवसाय केल्यास नक्कीच तुमचं नावही सगळीकडे होईल आणि तुम्हाला भरपूर प्रमाणात आर्थिक फायदाही मिळेल.