Business Idea : तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे का? कारण वाढती महागाई बघितली तर प्रत्येकाने काही ना काही प्रमाणात पैसे कमावलेच पाहिजेत. पण जर का तुम्हाला इतरांप्रमाणे कोणाच्या हाताखाली काम कारायचे नसेल तर चिंता करू नका, कारण व्यवसायांना देखील आजच्या जगात नोकरीप्रमाणेच प्राधान्य दिले जात आहे. व्यवसायाच्या क्षेत्राची खासियत म्हणजे इथे तुम्ही स्वतःची वेगळी कल्पना किंवा युक्ती वापरून पैसे कमावू शकता. मात्र व्यवसाय करत असताना कमीत कमी पैशात कशी सुरुवात हा विचार आपल्या डोक्यात असतो. परंतु जर तुम्ही सुद्धा नव्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही कमी खर्चात सुरु करू शकता. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया …
सध्या आम्ही बोलतोय कटलरीच्या व्यव्यसायाबद्दल (Business Idea), अगदी कमीत कमी पैसे गुंतवून या स्टार्टअपची सुरुवात केली जाऊ शकते पण योग्यरित्या केलेल्या व्यव्यसायातून दर महिन्याला भरपूर पैसे कमावता येतात. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारत सरकार तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत आर्थिक मदत देऊ करेल म्हणूनच व्यवसाय सुरु कारणात इच्छुक असलेल्या प्रत्येकानी कटलरीच्या व्यवसायाचा विचार नक्कीच करावा. कटलरीचा वापर अनेकदा पार्टी, पिकनिक, लग्न समारंभ आणि वेगेवेगळ्या खाण्या- पिण्याच्या संबंधित घटकांमध्ये केला जातो. त्यामुळे लक्ष्यात घ्या कि या व्यवसायाला मिळणारी मागणी कधीही कमी होणार नाही.
असा असेल तुमचा अनोखा व्यवसाय (Business Idea) :
एकतर या नवख्या व्यवसायामधून 20 हजार ते 40 हजार रुपयांची कामे दर महिना करता येते. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला वेल्डिंग सेट, बफिंग मोटार, बेंच ग्राइंडर इत्यादी मशिन्सची गरज भासणार आहे. त्यासाठी सुरुवातीला 1 लाख ते दीड लाख रुपये खर्च येऊ शकतो. परंतु केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही आर्थिक लाभ मिळवू शकता. मुद्रा योजनेचा फायदा करवून घेण्यासाठी सर्वात आधी सरकारच्या अधिकृत साईटला भेट द्या आणि अपेक्षित फॉर्म भरा. यामध्ये तुम्हाला नाव, पत्ता, शिक्षण, तुमचा खर्च आणि मिळकत यांबद्दल माहिती द्यावी लागेल. व्यवसाय करायचा असेल तर अश्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांमध्ये जास्तीत जास्ती लोकं गुंतवणूक करतात नाहीत, आणि म्हणूनच या व्यवसायांना (Business Idea) मागणी असणार आहे आणि अधिक स्पर्धक नसल्यामुळे तुम्हाला भरपूर नफा कमावता येईल.